घरCORONA UPDATEपैसे द्या नाहीतर कोरोनाचा संसर्ग करू- हॅकर्सची यूजर्सना ऑनलाईन धमकी

पैसे द्या नाहीतर कोरोनाचा संसर्ग करू- हॅकर्सची यूजर्सना ऑनलाईन धमकी

Subscribe

कोरोनाने जगभरात थैमान घातलेले असतानाच हॅकर्स कोरोनाच्याआड यूजर्सची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.  ब्रिटीश सिक्युरिटी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनी सोपोस Sophosने एक अहवाल सादर केला आहे. ज्यात हॅकर्स कधी जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी बनून तर कधी कोविड-१९ च्या नावाखाली बोगस वेबसाईट तयार करत यूजर्सकडून पैसे उकळत आहे.

कंपनीच्या अहवालानुसार हॅकर्स यूजर्सला धमकीचे मेल पाठवत आहेत. यात जर अपेक्षित रक्कम दिली नाहीत तर यूजर्सच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग करु शकतो असे या मेलमध्ये सांगत आहेत. तसेच पैसे न दिल्यास यूजर्स व त्याच्या कुटुंबीयांचे फोटो सोशल मीडियावर करोनाग्रस्त म्हणून जगभरात व्हायरल करू अशी धमकी या मेलमध्ये देण्यात येत आहे. यामुळे घाबरुन अनेक यूजर्स हॅकर्सच्या धमकयांना बळी पडत आहेत. असे Sophos च्या अहवालात सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तसेच ४००० डॉलर बिटकॉईनच्या माध्यमातून द्या. नाहीतर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाचा संसर्ग केला जाईल अशा धमकीचे मेल जगातील अनेक यूजर्सला येत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर यूजर्सचा पासवर्ड व त्याची वैयक्तिक माहिती आपल्याकडे आहे. असा दावाही हे हॅकर्स करत असल्याने कोरोनोबरोबरच या नव्या कोरोना ऑनलाईन धमकीने जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -