घरताज्या घडामोडीफेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरला

फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरला

Subscribe

हॅकर्सनी कोट्यवधी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे समोर आले आहे.

फेसबुक वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात फेसबुकवर बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले जातात. असाच प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. दरम्यान, आता हॅकर्सनी कोट्यवधी फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरल्याचे समोर आले आहे. ब्रिटनची कंपनी कँब्रिज Analytica विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ५.६२ लाख भारतीय फेसबुक युजर्सचा डेटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एएनआयने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण?

ग्लोबल सायन्स रिसर्चने बेकायदेशीरपणे ५.६२ लाख भारतीयांचा डेटा चोरी केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी हा डेटा चोरी करुन कँब्रिज Analyticaसोबत शेअर केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सोशल मीडिया कंपनीने सीबीआयला दिली आहे. यावर कँब्रिज Analyticaने ग्लोबल सायन्स रिसर्चकडून अवैधपणे खासगी डेटा घेतल्याचा आणि त्याचा वापर भारतातील निवडणुकीवर परिणाम होण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

५ लाखांचा डेटा हस्तगत

मार्च २०१८ मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कँब्रिज Analyticaचे माजी कर्मचारी, सहकारी आणि कागदपत्रांच्या आधारे ५ कोटी ६२ लाख ४५५ भारतीयांचा फेसबुक डेटा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – राजपथावर यंदा महाराष्ट्राची ‘संत परंपरा’ अवतरणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -