घरताज्या घडामोडीHajj Pilgrimage : हज यात्रेसाठी यंदा परदेशी प्रवाशांवर बंदी; केवळ ६० हजार...

Hajj Pilgrimage : हज यात्रेसाठी यंदा परदेशी प्रवाशांवर बंदी; केवळ ६० हजार यात्रेकरूंना परवानगी

Subscribe

लसीकरण झालेले १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिक आणि दीर्घकालीन रोगांपासून मुक्त असलेल्या नागरिकांनाच मक्केत प्रवेश दिला जाणार आहे. 

हज यात्रा यंदा केवळ स्थानिक नागरिकांपुरती मर्यादित असून ६० हजार हून अधिक यात्रेकरूंना मक्केत प्रवेश दिला जाणार नसल्याची सौदी अरेबियाने दिली आहे. तसेच हज यात्रेसाठी यंदा परदेशी प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, हा निर्णय घेण्यात आल्याचे सौदी प्रेस एजंसीकडून सांगण्यात आले. लसीकरण झालेले १८ ते ६५ वर्षे वयोगटातील नागरिक आणि दीर्घकालीन रोगांपासून मुक्त असलेल्या नागरिकांनाच मक्केत प्रवेश दिला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय

कोरोनाच्या काळात हज यात्रेकरूंची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस असतानाही या विषाणूवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच काही देशांत वेगळे व्हेरियंट सापडत आहेत. त्यामुळे हज यात्रा यंदा केवळ स्थानिक नागरिकांपुरती मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सौदीचे आरोग्यमंत्री तौफिक अल-रबीया यांनी सांगितले.

- Advertisement -

मागील वर्षी एक हजार यात्रेकरूंना प्रवेश

मागील वर्षी हज यात्रेसाठी सौदीत असलेल्या केवळ एक हजार यात्रेकरूंना मक्केत प्रवेश देण्यात आला होता. यापैकी बहुतांश यात्रेकरू हे परदेशी नागरिक होते. एरवी साधारणतः जगातील २० लाख मुस्लीम भाविक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी येतात. मक्केत घनाकृती काबाभोवती जमून ते रोज नमाज पठण करीत आहेत. हज यात्रा पाच दिवसांची असून जगातील सर्वात जास्त लोक उपस्थित असलेला हा धार्मिक कार्यक्रम असतो.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -