घरदेश-विदेशअर्धा लिटर नंदिनी दूध आणि 3 मोफत गॅस सिलिंडर; भाजपचे कर्नाटकच्या जनतेला आश्वासन

अर्धा लिटर नंदिनी दूध आणि 3 मोफत गॅस सिलिंडर; भाजपचे कर्नाटकच्या जनतेला आश्वासन

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीनिमित्त प्रत्येक पक्ष जनतेला आपल्या खेचून घेण्यासाठी वेगवेगळी आश्वासने देत आहे. यात आता प्रत्यके पक्षाने जाहीरनामे प्रसिद्ध करायला सुरूवात केली आहे. भाजपाने देखील जाहीरनामा प्रसिद्ध करताना अर्धा लिटर नंदिनी दूध आणि वर्षातून तीनदा मोफत सिलेंडर देण्याची घोषणा केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 10 मेला मतदान होणार आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असल्याने राजकीय पक्षांनी आपला प्रचार तीव्र केला आहे. काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासह बडे नेते प्रचार उतरले आहेत, तर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीसह (Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाशासीत राज्यांचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात आता जनतेला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्रत्येक पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध करायला सुरूवात केली आहे. अशात भाजपचाही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. यात त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.

- Advertisement -

समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक घोषणांचा पाऊस पाडला आहे. भाजपने अण्णा, अक्षरा, आरोग्य, अभिवृद्धी, आद्य आणि अभया या 7 ‘अ’च्या बाबी लक्षात घेतल्या आहे. त्यानुसार कर्नाटकमध्ये समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहेत. याशिवाय बीपीएल कार्डधारकांना तीन मोफत गॅस सिलेंडर आणि पोषण आहार योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला अर्धा लिटर नंदिनी दूध देण्याचेही आश्वासन भाजपाने दिले आहे. प्रत्येक वॉर्डात अटल आहार केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे नागरिकांना स्वस्तात अन्न मिळणार आहे. कर्नाटकमध्ये NRC लागू करण्याचेही आश्वासन भाजपने दिले आहे. अवैध निर्वासितांना हद्दपार करू, असा शब्द भाजपने कर्नाटकच्या जनतेला दिला आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यात काय…
1. बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि दर महिन्याला पाच किलो धान्याचे किट
2. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरवर्षी उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला तीन गॅस सिलेंडर
3. समान नागरी संहिता लागू करण्याचे आश्वासन
4. वोक्कलिंगा आणि लिंगायत या समाजाला दोन टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन
5. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात स्वस्त, दर्जेदार आणि सकस आहार देण्यासाठी अटल आहार केंद्र
6. कुटुंबातील पाच महिलांसाठी प्रति वर्ष 10,000 रुपयांची एफडी करण्याचं आश्वासन
7. निराधारांसाठी 10 लाख घरे
8. ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -