घरदेश-विदेशसुषमा स्वराज यांची भेट घेताच हमीद अन्सारी रडला

सुषमा स्वराज यांची भेट घेताच हमीद अन्सारी रडला

Subscribe

बुधवारी सकाळी हमीदने सुषमा स्वराज यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अन्सारी कुटुंबिय भावुक झाले.

हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या तुरुंगात ६ वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर हामिद अन्सारी आपल्या मायदेशी परतला आहे. बुधावारी हमीदने आपल्या कुटुंबियांसोबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. हमीदला भारतात आणण्यासाठी सुषमा स्वराज यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सुषमा स्वराज यांनी गळाभेट घेऊन हमीद अन्सारी याचे स्वागत केले. सुषमा स्वराज यांना भेटताच हमीद भावूक झाला आणि त्याला रडू आवरले नाही. त्याने सुषमा स्वराज यांचे आभार मानले. त्यांनी देखील हमीदच्या प्रती संवेदना व्यक्त करत, तुझे भाग्य तुला भारतात परत घेऊन आले असल्याचे स्वराज यांनी म्हटले. दरम्यान, हमीदच्या आईने देखील सुषमा स्वराज यांचे आभार मानले. ‘मेरा भारत माहन, मेरी मॅडम महान’ असे म्हणत त्यांनी सुषमा स्वराज यांचे आभार मानले.

- Advertisement -

कुटुंबियांनी मानले आभार

हमीद अन्सारीच्या कुटुंबियांनी हमीदला भारतात आणण्यासाठी याआधी स्वराज यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, सुषमा स्वराज यांना भेटून आमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला होता त्यामुळे आमची इच्छाशक्ती वाढली होती की, आमचा मुलगा घरी परत येणार. बुधवारी सकाळी हमीदने सुषमा स्वराज यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अन्सारी कुटुंबिय भावुक झाले. स्वराज यांना भेटताना सर्वांना रडू आवरले नाही. हमीदच्या आईने सुषमा स्वराज यांचे आभार मानत ‘मेरा भारत महान, मेरी मॅडम महान’ असे म्हटले. माझ्या मुलाला भारतात आणण्याचे सर्व श्रेय मॅडमला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

हमीद अन्सारी इंजिनिअर आहे. मुंबईतल्या वांद्रे येथे राहणाऱ्या हमीदची पाकिस्तानमधील कोहटक येथे राहणाऱ्या एका तरूणीशी फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर दोघांमधील संवाद दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर फेसबुकवरील त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा निर्णय हमीद अन्सारीनं घेतला. त्यासाठी तो अफगणिस्तानमार्गे पाकिस्तामध्ये गेला. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. १२ नोव्हेंबर २०१२ ला त्याला पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याला ६ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सुटकेसाठी कुटुंबियांनी केले प्रयत्न

इतर कोणत्याही प्रकरणात त्याचा सहभाग नसेल तर त्याची सुटका करावी असं देखील यावेळी पाकिस्तानच्या न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्याचा सुटकेची मागणी आई – वडील आणि द पाकिस्तान इंडिया पीपल्स फॉर पीस अँड डेमोक्रेसीनं केली आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये शांतीचा संदेश जाईल. संवाद देखील वाढेल असं म्हटलं गेलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी देखील भारताशी संबंधांवर सकारात्मक पावलं टाकण्याचा निर्णय घेतल्यानं हमीदच्या कुटुंबियांची आशा आणखी वाढली आहे.

हेही वाचा – 

मैत्रिणीला भेटण्यासाठी पाकमध्ये गेलेल्या हमीदच्या सुटकेची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -