घरदेश-विदेशपाकिस्तानात अडकलेला झाराच्या 'वीर'ची आज देशवापसी

पाकिस्तानात अडकलेला झाराच्या ‘वीर’ची आज देशवापसी

Subscribe

मुंबईचा रहिवासी हामिद नेहाल अंसारी ऑनलाईन साईटवर एका पाकिस्तानच्या मुलीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपूर्वी तो तिला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानला निघून आला.

शाहरुख- प्रितीचा ‘वीर-झारा’ सिनेमातील प्रेमकहाणी अनेकांनी पाहिली असेल. पाकिस्तानची मुलगी आणि भारताचा मुलगा अशी प्रेमकहाणी यामध्ये दाखवण्यात आली होती. असेच पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला तरुण पाकिस्तानला पोहोचला खरा पण हेरगिरीच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. आता अखेर ६ वर्षानंतर तीन वर्षे कारागृहाची शिक्षा भोगून हा तरुण देशात परतणार आहे. हामिद नेहाल अन्सारी असे त्याचे नाव असून आज त्याची देशवापसी होणार आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisement -
वाचा- कुलभूषण जाधव केस:पाक ICJमध्ये आज सादर करणार प्रतिज्ञापत्र

नेमकी घटना काय?

मुंबईचा रहिवासी हामिद नेहाल अन्सारी ऑनलाईन साईटवर एका पाकिस्तानच्या मुलीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. तीन वर्षांपूर्वी तो तिला भेटण्यासाठी थेट पाकिस्तानला निघून आला. अफगाणिस्तानमार्गे तो पाकिस्तानला पोहोचला. पाकिस्तानला पोहोचल्यानंतर तेथील सैन्याने तो भारतीय असल्यामुळे त्याला ताब्यात घेतले.त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याला पाकिस्तानच्या विशेष कोर्टाने हेरहिरीमुळे ३ वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा पूर्ण झाली असून आज तो मुंबईत परतणार आहे.

वाचा-कुलभूषण जाधव यांच्यासाठी राजनैतिक मदतीची मागणी – स्वराज

कुटुंबियांनाही कल्पना नव्हती

हमिद कुठे गेला? या बद्दल तिच्या आईला काहीच कल्पना नव्हती. तो अचानक गायब झाला त्यानंतर आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर तो पाकिस्तानात सैन्याच्या ताब्यात असल्याचे कळले. त्यानंतर त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सध्या पाकिस्तानच्या ताब्यात कुलभूषण जाधव आहेत. त्यांनादेखील हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेसाठीदेखील देशाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -