घरदेश-विदेशओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन 'ब्लॅक लिस्ट'मध्ये!

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये!

Subscribe

अल् कायदाचा म्होरक्या दहशतवादी ओसामा बिन लादेनचा २१ वर्षीय मुलगा हमजा बेन लादेनचा सौदी अरेबियाचे नागरिकत्व रद्द करण्यात आले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेकडून त्याचे नाव काळ्या यादीत समावेश केला आहे.

अल कायदा‘ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन, याचे सौदी अरेबियातील नागरिकत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, आता या गोष्टीचा सार्वजनिक खुलासा करण्यात आला आहे. तसेच संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने हमजा बिन लादेनचा ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये समावेश केला आहे. त्याच्या प्रवासावर आणि मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. ओसामा बिन लादेनच्या अमेरिकेनी खात्मा केल्यानंतर अयमान अल जवाहिरी हा ‘अल कायदा’ दहशतवादी संघटनेचा प्रमुख बनला आणि हमजा बिन लादेन हा ‘अल कायद्या’चा उत्तराधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. हमजा बिन लादेन हा फक्त २१ वर्षांचा तरूण आहे.

लादेनच्या खात्म्याचा बदला

अमेरिकेने मे २०११ रोजी ओसामा बिन लादेनचा पाकिस्तानमध्ये खात्मा केला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी हमजा बिन लादेन अमेरिकेवर हल्ला करणाचा कट रचत होता. ही बातमी अमेरिकेला समजताच त्यांनी हमजाबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले. त्यानंतर त्याचे नागरिकत्व काढून घेण्यात आले.

- Advertisement -

प्रवास आणि शस्त्रास्त्र व्यापारावर प्रतिबंध

हमजा बिन लादेन हा गेली काही वर्ष वेगवेगळ्या देशांमध्ये लपला होता. अल जवाहिरी याने हमजा हा ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचा अधिकृत सदस्य आहे अशी घोषणा केली होती. दरम्यान, त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने जारी  केलेल्या एक निवेदनात म्हटले आहे की, ‘अयमान अल जवाहिरी यांनी केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर सर्व राष्ट्रांनी हमजा बिनची सर्व मालमत्ता, खाती गोठवावी. तसेच प्रवास आणि शस्त्रास्त्र व्यापारावर प्रतिबंध घालावा’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -