घरताज्या घडामोडीHappiest cities in the world: ही आहेत भारतातील सर्वात आनंदी शहर ,...

Happiest cities in the world: ही आहेत भारतातील सर्वात आनंदी शहर , मुंबई मात्र सर्वात निराशाजनक

Subscribe

जर रोजच्या धकाधकीच्या जीवनाला तुम्ही कंटाळले आहात, कुठेतरी शांत आणि आनंदी आयुष्य व्यतीत करता येईल अशा ठिकाणाच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. कारण ब्रिटनमधील ऑनलाईन मॉर्गेज एडवायझरच्या अभ्यासात भारतातील शहरांबदल तेथील लाईफस्टाईलबदद्ल रोचक माहिती समोर आली आहे. त्यानुसार जगातील सर्वात आनंदी २० शहरांपैकी पाच शहर भारतातील आहेत. यात चंदीगडचा पहीला क्रमांक असून स्वप्ननगरी असलेल्या मुंबईला मात्र या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. उलट मुंबई हे सर्वाधिक निराशाजनक शहर असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

- Advertisement -

तसेच या संशोधनानुसार घर खरेदी करण्यासाठी सर्वात आनंदी शहर स्पेनमधील बार्सिलोना असून दुसऱ्या क्रमांकावर उटलीतील फ्लॉरेन्स तर तिसऱ्या स्थानावर दक्षिण कोरियाचे उल्सान शहर आहे. तर राहण्याबरोबरच आनंद देणाऱ्या शहरांमध्ये भारतातील चंदीगड हे शहर पाचव्या स्थानावर आहे. तर  २० आनंदित शहरांमध्ये भारतातील जयपूर दहा, चेन्नई १३ इंदौर आणि लखनौ १७ आणि २० व्या स्थानी आहे. तर सिटी ऑफ ड्रीम्स असलेल्या मुंबईचा हैप्पीनेस स्कोर १०० पैकी ६८.४ होता. हा स्कोर घर खरेदी करण्यासाठी योग्य असलेल्या हैप्पीनेस स्कोरपेक्षा १७.१ टक्क्यांनी कमी आहे. तर अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी हे शहर देखील राहण्यासाठी मुंबईसारखेच निराशनक असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे. तर जगात कमी आनंदीत असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई नंतर सूरतला स्थान देण्यात आले आहे.

- Advertisement -

हैप्पीनेस स्कोर संदर्भातील हे संशोधन ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आले आहे. जगभरातील हजारो जियो टॅगिंग इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारावर हे निकष लावण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये टॅग करण्यात आलेल्या चेहऱ्यांवरील हावभावांवरून संबंधित व्यक्ती नवीन घरात किती आनंदी आहे याचा अनुमान लावण्यात आला आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -