पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू यांच्यासह ‘या’ राजकीय दिग्गजांकडून देशवासीयांना नवं वर्षाच्या शुभेच्छा

happy new year 2023 pm narendra modi president draupadi murmu congress mp rahul gandhi congratulated on the new year welcome 2023

सरत्या 2022 या वर्षाला निरोप देत अनेकांनी नवं वर्षातील पहिला सुर्योदय पाहण्याचा आनंद घेतला आहे. 31 डिसेंबर रात्री उशिरापर्यंत न्यू ईअर सेलिब्रेशनचा उत्सव सुरु होता. यानंतर अनेकांनी नव्या संकल्पना, उत्साहात नवीन वर्षातील पहिल्या दिवसाची सुरुवात केली आहे. यात अनेक जण जगभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांवर जात देवाकडे नवीन वर्ष आनंदात, सुखात आणि भरभराटीचं जावो यासाठी साकडं घालत आहेत. यासोबत सोशल मीडियावरही नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांनी देशवासियांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वांना उत्तम आरोग्य लाभो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त ट्विट करत लिहिले की, तुम्हाला 2023 हे वर्ष चांगले जावो! ते आशा, आनंद आणि भरपूर यशाने भरलेले जावो. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.

२०२३ हे वर्ष आयुष्यात नवीन प्रेरणा, उद्दिष्टे, उपलब्धी घेऊन येवो- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत लिहिले की, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा! परदेशात राहणाऱ्या सर्व नागरिक आणि भारतीयांना शुभेच्छा आणि शुभेच्छा. २०२३ हे वर्ष आपल्या आयुष्यात नवीन प्रेरणा, उद्दिष्टे आणि उपलब्धी घेऊन येवो. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसमावेशक विकासासाठी स्वतःला झोकून देण्याचा संकल्प करूया.

सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा- राहुल गांधी 

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ट्विट केले की, 2023 मध्ये प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात प्रेमाची दुकानं उघडतील अशी आशा आहे, सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी देखील देशवासियांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Happy New Year 2023 : नवा उत्साह, नवा जल्लोष; मुंबईसह देशभरात नव्या वर्षाचं स्वाग