घरदेश-विदेशपंतप्रधानांचे निकटवर्तीय खासदार रतनलाल कटारिया यांचं निधन

पंतप्रधानांचे निकटवर्तीय खासदार रतनलाल कटारिया यांचं निधन

Subscribe

हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कटारिया हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते.

हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कटारिया हे बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना चंदीगड पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. हरियाणा भाजपचे प्रभारी बिप्लब देव बुधवारीच त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्या निधनावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.( Harayana story Ratanlal Kataria BJP Mp from Ambala Passed away in Chandigarh PGI )

रतनलाल कटारिया यांच्या पत्नी बंतो कटारिया यांनी दिवंगत खासदारांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, ‘अत्यंत दु:खी अंतःकरणाने तुम्हा सर्वांना कळवण्यात येते की, माझ्या जीवनाचा आधार आणि माझे जीवन साथीदार रतनलाल कटारिया प्रभूंच्या चरणी मग्न झाले आहेत. दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतन लाल कटारिया यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. समाजाच्या हितासाठी आणि हरियाणातील लोकांच्या प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच संसदेत आवाज उठवला. त्यांच्या जाण्याने राजकारणाची कधीही भरून न येणारी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या पावन चरणी स्थान देवो आणि या कठीण प्रसंगी कुटुंबियांना बळ देवो. ओम शांती!

हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आनंदी स्वभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या शिखरावर होता, गरिबीतून उठून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचले, खूप लवकर आम्हाला सोडून गेले. निसर्ग ही त्यांची संपत्ती होती, त्यांचं घर भाजपचे घर आहे, त्यांच्यासोबत अनेक दशके काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्या जाण्याने देशाचे, राज्याचे, भाजपचे आणि माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisement -

( हेही वाचा: मोठी बातमी! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं )

असा आहे राजकीय प्रवास

RSS चे पाच दशके सक्रिय सदस्य असलेले रतनलाल कटारिया यांचा जन्म 19 डिसेंबर 1951 रोजी हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील संधली गावात झाला. राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी LLB ही केले. 1985 मध्ये रादौरमधून निवडून आले. 2000 ते 2003 पर्यंत त्यांनी पक्षाचे हरियाणा अध्यक्ष म्हणूनही काम केले. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून आले (1999, 2014 आणि 2019) आणि मोदी सरकारमध्ये जलशक्ती आणि सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री देखील होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -