घरदेश-विदेशआमरण उपोषणादरम्यान हार्दिक पटेलने जाहीर केले मृत्यूपत्र

आमरण उपोषणादरम्यान हार्दिक पटेलने जाहीर केले मृत्यूपत्र

Subscribe

पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यामागणीसाठी हार्दीक पटेल २५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसला असून आज उपोषणाचा दहावा दिवस आहे.

पाटीदार समाजाचे नेते हार्दिक २५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या नवव्या दिवशी हार्दिक पटेलने मृत्यूपत्र जाहीर केले आहे. हार्दिक पटेल याने शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. आई उषा पटेल, वडील भरत पटेल, बहिण, एक गोशाळा आणि २०१५च्या कोटा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या १४ तरुणांच्या कुटुंबियांमध्ये आपल्या संपत्तीचे वाटप करण्यात यावे असे हार्दीकने म्हटले आहे. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यामागणीसाठी हार्दीक पटेल २५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसला असून आज उपोषणाचा दहावा दिवस आहे.

१० व्या दिवशी हार्दिकचे उपोषण सुरुच

गेल्या १० दिवसापासून हार्दिक पटेलचे आमरण उपोषण सुरु आहे. गेल्या १० दिवसापासून हार्दिकने काहीच खालले नाही. तसंच गेल्या ३६ तासापासून हार्दिकने पाणी प्यायले नाही. त्यामुळे त्याचे शरीर अशक्त झाले आहे. आजार आणि संक्रमणामुळे शरीरातील वेदना खूप वाढल्या आहेत. तसंच हार्दिकच्या तपासणीसाठी डॉक्टर आले होते. त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. मात्र हार्दिकने तपासणीला नकार दिला. मला शरीरावर विश्वास राहीला नाही माझ्या शरीरातून आत्मा केव्हाही जाऊ शकतो. त्यामुळे हार्दिकने मृत्यू पत्र तयार केले असल्याचे पाटीदार समाजाचे नेते मनोज पानेरा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मृत्यूपत्रात व्यक्त केली शेवटची इच्छा

हार्दिकने तयार केलेल्या मृत्युपत्रात त्याने संपत्तीचे वाटप आणि शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात यावे असेही त्यांनी मृत्युपत्रात म्हटले आहे. हार्दिकने मृत्यू झाल्यास त्यांच्या बँक खात्यातील ५० हजार रुपयांतील २० हजार रुपये आई-वडील आणि बहिणीच्या नावावर तर ३० हजार रुपये अहमदाबादमधील गोशाळेला देण्यात यावी. ‘हू टूक माय जॉब’ या त्यांच्या पुस्तकाची ३० टक्के रॉयल्टी आई-वडील आणि बहिणीला देण्यात यावी. तसंच तर २०१५ मध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या १४ तरुणांच्या कटुंबीयांना ७० टक्के रॉयल्टी देण्यात यावी असे हार्दिक पटेल याने मृत्यूपत्रात म्हटले असल्याचे मनोज पानेरा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -