हार्दिक पटेलचा काँग्रेसमधून राजीनामा, पक्षाला मोठा धक्का

आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पावलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असंही तो म्हणालाय. 

hardik patel

नवी दिल्लीः गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलनं काँग्रेसचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे, गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेस पक्षाला फटका बसला आहे. काँग्रेसचा राजीनामा देताना हार्दिक पटेलने काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.

हार्दिक गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांवर नाराज होता आणि त्यामुळे तो पक्ष सोडल्याची अटकळ आधीच बांधली जात होती. काँग्रेस सोडताना हार्दिक पटेलने ट्विटमध्ये लिहिले की, आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, मला विश्वास आहे की माझ्या या निर्णयाचे प्रत्येक सहकारी आणि गुजरातमधील लोक स्वागत करतील, मला विश्वास आहे की या पावलानंतर माझ्याकडून, मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन, असंही तो म्हणालाय.