घरताज्या घडामोडीHardik Patel : हार्दिक पटेल भाजपच्या वाटेवर? भगव्या उपरण्यातल्या लूकमुळे चर्चांना उधाण

Hardik Patel : हार्दिक पटेल भाजपच्या वाटेवर? भगव्या उपरण्यातल्या लूकमुळे चर्चांना उधाण

Subscribe

गुजरात प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो व्हॉटसअप डीपीत ठेवला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मागे आयटी आणि ईडीची पीडा लागल्याने अनेक नेत्यांनी भाजपकडे वाट वळवली आहे. तर आता गुजरातमध्येही असंच काहीसे चित्र दिसून येत आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी गळ्यात भगवे उपरणे घातलेला फोटो व्हॉटसअप डीपीत ठेवला आहे. यामुळे पटेल लवकरच भाजपवासी होणार अशा चर्चा आता गुजरातच्या राजकारणात रंगू लागल्या आहेत.

तसेही राजकारणात कधीही कोणी कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणाच्या भाषेत येथे प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार माणस जोडतो आणि नंतर दूरही करतो. असंच काहीसं सध्या गुजरातमध्ये पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसला म्हणावा तसा जम असूनही बसवता आला नाही. तसेच पक्षातील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर येत आहेत. काँग्रेस सुप्रिमो सोनिया गांधीही  हार्दिक पटेल यांच्या मतांना फार महत्व देत नाहीत. यामुळे पटेल दुखावले आहेत. काँग्रेसमध्ये आपली अवस्था नवपरिणीत नवरदेवाची नसबंदी केल्यासाऱखी झाली आहे. असे सांगत त्यांनी जाहीरपणे आपली नाराजगी अनेकवेळा बोलूनही दाखवली आहे. पण याचदरम्यान पटेल भाजपची खुलेआम स्तुती करत आहेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आपण रामभक्त असल्याचे म्हटले होते. तर काही दिवसांपूर्वी पटेल यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अंत्यसंस्कारानंतर त्यांनी चार हजार भगवद्गगीता वाटल्या होत्या. त्यावर बोलताना मी हिंदू असून हिंदू असल्याचा मला अभिमान आहे असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसमध्ये पटेल यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. तसेच गुजरातमधील पक्षनेतृत्वाच्या कारभारावरही पटेल नाराज असून त्याबदद्ल त्यांनी सोनिया गांधीनाही सूचित केले. पण त्यावर सोनिया यांनी काहीच पावले उचलली नाहीत. यादरम्यान पटेल यांनी गुजरातमधील भाजपवर कौतुकाचा वर्षाव केला होता.


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -