घरCORONA UPDATECorona: याचतरी ऐका! यम सांगतोय घरात बसा, नायतर तुम्हाला घेऊन जाईन

Corona: याचतरी ऐका! यम सांगतोय घरात बसा, नायतर तुम्हाला घेऊन जाईन

Subscribe

उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये पोलिसांनी एका कलाकाराला यमाच्या वेशात नागरिकांमध्ये पाठवले आहे. हा यम लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सर्व नागरिकांना घरातच बसून सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळायचा आहे. यामुळेच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळू शकतो, असे वारंवार सर्व यंत्रणांकडून सांगितले जात आहे. मात्र सरकार, पोलीस, पालिका प्रशासनाने अनेकदा सांगूनही नागरिकांची काही भागांमध्ये मोठ्य प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. पोलीस किंवा पालिका प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने समाजात जनजागृतीचे काम सध्या करत आहेत. अशीच एक वेगळी पद्धत उत्तराखंडमध्ये पाहायला मिळाली. इथे चक्क पोलिसांनी एका कलाकाराला यम बनवून लोकांमध्ये पाठवले आहे. यमाचा अवतार घेतलेल्या या कलाकाराने लोकांना घरीच बसण्याचे आवाहन केले. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता किमान यमाच तरी ऐका आणि घरी बसा, असं नागरिकांना सांगण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये पोलिसांनी एका कलाकाराला यमाच्या वेशात नागरिकांमध्ये पाठवले आहे. हा यम लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे. घरात बसा, नाहीतर तुम्हाला घेऊन जाईन, असे तो माईकवर सांगत आहे. तसेच जीवनावश्यक वस्तू किंवा औषधं घेण्यासाठी घराबाहेर पडत असाल. तर तोंडावर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा, असेही तो सांगत आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माणूस मेल्यानंतर यमराज त्याला घ्यायला येतो, असा समज आहे. तो माणसाला यमलोकात घेऊन जातो. तिथे त्याच्या पाप पुण्याचा हिशोब केला जातो. त्याचीच भीती लोकांच्या मनात घातली जात आहे. अर्थात हा एक कलाकार आहे, हे सर्वांनाच माहिती असून पोलीस मात्र विविध पद्धतीने लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न यातून करत आहेत. यापूर्वीही चेन्नईमध्ये पोलिसांनी हेल्मेट वापरून तर सांगलीत भूत बनून लोकांमध्ये जनजागृती केली आहे.

हेही वाचा –

आयआयएल कंपनी शोधणार कोरोनाची लस; ग्रिफिथ युनिव्हर्सिटीसोबत करार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -