Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो; नीती आयोगाच्या सदस्याचे भाकीत

कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो; नीती आयोगाच्या सदस्याचे भाकीत

Related Story

- Advertisement -

देशातील कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार त्या दिशेने प्रयत्न देखील करत आहे. दरम्यान, देशातील कोरोनाच्या सद्यस्थिती संदर्भातील सचिव स्तरावरील एक बैठक पार पडली. यावेळी केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी चिंता व्यक्त केली की, यंदाचा कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरू शकतो. यावेळी उच्चस्तरीय बैठकीत सहभागी असलेल्या सदस्याने सांगितले की, “जर सरकारने ठरलेल्या वेळेपूर्वी कुंभ संपविण्याचा निर्णय घेतला नाही तर हा कुंभमेळा कोरोनाचं सुपर स्प्रेडर ठरू शकतो.”, असे भाकीत देखील नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सरकार एका पथकाच्या सहाय्याने, जे साधू आणि धार्मिक नेत्यांच्या मदतीने कुंभ येथे जाणाऱ्या यात्रेकरूंना मास्क घालणं, सामाजिक अंतर पाळण्यासाठी आवाहन करणार आहे. तर यावेळी टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातूनही संदेश देण्यात यावा, अशी सूचना सरकारने या पथकाला केली आहे. तसेच लोकांमध्ये कोरोनाविषयक जागरूकता पसरविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावण्यात यावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकार कुंभ वेळेपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेत असून त्या दिशेने विचार करत आहे. लोकांमध्ये या कोरोना संसर्गाची भीती कायम राहावी यासाठी सरकार ‘Healthy Fear for Corona’ मोहीम घेण्याची योजना आखत आहे.

उत्तराखंड सरकारने यासंदर्भातील नियमावली जारी केली होती. या अंतर्गत कुंभमेळ्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोनाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कुंभमेळ्या दाखल होण्यापूर्वी यात्रेकरूना ७२ तासांपूर्वी आपली RTPCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणं आनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीही उत्तरखंड सरकारला कुंभमेळ्यादरम्यान जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात राखण्यासाठी सर्व कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

यंदा कुंभमेळ्यादरम्यान १२, १४ आणि २७ एप्रिल रोजी तीन शाही स्नान होणार आहे. कुंभमेळा भारतात चार वेगवेगळ्या ठिकाणी नाशिक, हरिद्वार, प्रयागराज आणि उज्जैन येथे आयोजित करण्यात येतो. सामान्य परिस्थितीत हा कुंभ साधारण चार महिन्यांपर्यंत चालतो. यंदा मात्र कोरोनाचं सावट असल्याने या कुंभाचा कालावधी कमी करण्यात आला आहे.


 

- Advertisement -