Haris Rauf- या बॉलरने सॅनिटायझरने हात धुवून लावला मास्क नंतर केले सेफ सेलिब्रेशन

पाकिस्तानच्या एका बॉलरने सेलिब्रिशनचा नवा फंडा शोधून काढला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला बदलून टाकले असून यापासून खेळही अपवाद राहीला नाहीये. खेळांवरही कोरोनाचा इफेक्ट आता दिसू लागला आहे. पूर्वी क्रिकेट खेळताना बॉल गुळगुळीत करण्यासाठी बॉलर त्यावर थुंकी  लावायचे. पण आता त्याजागी घाम लावला जात आहे. क्रिकेट सामने आता भरगच्च स्टेडीयममध्ये नाही तर रिकाम्या स्टेडीयममध्ये होत आहेत. यामुळे पाकिस्तानच्या एका बॉलरने सेलिब्रिशनचा नवा फंडा शोधून काढला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हरिस रौफ (Haris Rauf)असे या बॉलरचे नाव आहे.

जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली असतानाच ऑस्ट्रेलियात मात्र बिग बैश लीग(big bash league) सुरू आहे. जगभरातील दिग्गजांनी यात सहभाग घेतला आहे. मंगळवारी याच लीगमधल्या पाकिस्तानी पेसर हरिस रौफचा एक व्हिडीओ व्हायरल झाला . यात मेलबर्न स्टार्सतर्फे खेळताना रौफ याने पर्थ स्कॉचर्सच्या कर्टीस पॅट्रसनला आऊट केले. त्यानंतर रौफने आनंद साजरा करताना  सॅनिटायझरने हात धुतल्याची  अॅक्टींग केली नंतर खिशातून मास्क काढून तोंडावर लावला. त्याच्या या छोट्याशा कृतीने सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले आहे. सेफ सेलिब्रेशनच्या नावाखाली या व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. रौफ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी कॅप्टन कूल धोनीने रौफ ला त्याची स्वाक्षरी असलेली जर्सी गिफ्ट म्हणून दिली होती. त्यावर रौफने आनंद व्यक्त केला होता.