घरदेश-विदेशहरियाणात काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

हरियाणात काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Subscribe

या गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू

मंगळवारी हरियाणातील फरिदाबाद येथे काँग्रेस नेत्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडण्यात आलेल्या काँग्रेस नेत्याचे नाव विकास चौधरी असून आपल्या कारमधून प्रवास करताना त्याच्यांवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी होऊन विकास चौधरींचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

जीममधून बाहेर पडल्यावर विकास चौधरी यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांवर गोळ्या झाडल्यात.आठ ते दहा गोळ्य़ा ते गाडीत बसले असताना त्यांच्यावर झाडण्यात आल्या आहे. या घटनेनंतर ते जखमी झाल्यावर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.

या गोळ्या नेमक्या कोणी झाडल्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसने या हत्येचा निषेध करत हरयाणात जंगलराज पसरत चालला असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

‘राज्यात जंगलराज वाढत चालला आहे. लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. काल एका महिलेने छेडछाडीचा विरोध केला तर तिच्यावर चाकूने हल्ला चढविण्यात आला होता. हे असे प्रकार वाढत चालले आहेत’ असे हरयाणा काँग्रेसचे अध्यक्ष अशोक तनवर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -