Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमHaryana Crime : शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून रिमोटने उडवला, 13 विद्यार्थ्यांवर कारवाई

Haryana Crime : शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून रिमोटने उडवला, 13 विद्यार्थ्यांवर कारवाई

Subscribe

संबंधित शिक्षिकेने खुर्चीखाली बॉम्ब ठेवणाऱ्या 13 विद्यार्थ्यांना माफ केले असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी नरेश मेहता यांनी सांगितले. या मुलांनी एखादे मॉडेल बनवून ते सादर केले असते तर आम्ही त्यांचा सन्मान केला असता, पण आता हे प्रकरण धोक्याचा इशारा दर्शवत आहे. ही सर्व मुले यूट्यूबवरून हे सर्व शिकली होती, असे ते म्हणाले.

(Haryana Crime) चंदिगढ : हरियाणामध्ये एका शाळेतील बारावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवला आणि नंतर रिमोटच्या सहाय्याने त्याचा स्फोट केला. सुदैवाने शिक्षिक बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. (Action taken against students who placed bombs under the teacher’s chair)

विज्ञान विषयाच्या शिक्षिका भर वर्गात ओरडल्याचा राग काही विद्यार्थ्यांच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याचे त्यांनी ठरवले. एका विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या खुर्चीखाली बॉम्बसदृश फटाका ठेवला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याने रिमोट कंट्रोलद्वारे सक्रिय केल्यावर त्याचा स्फोट झाला. बॉम्ब कसा बनवायचा हे या विद्यार्थ्यांनी युट्यूबवर पाहिले आणि नंतर तो रिमोट कंट्रोलने ऑपरेट केला.

- Advertisement -

हेही वाचा – RokhThok : अमित शहांचे नाटक महाराष्ट्राने पाहिले, संजय राऊतांचा घणाघात

हिसार जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत सर्व 13 विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले आहे. यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू केली. या घटनेनंतर या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याबाबतही चर्चा झाली, मात्र त्यांच्या पालकांनी माफी मागितली आणि भविष्यात असे वर्तन हे विद्यार्थी करणार नाहीत, असे लिहून दिले, त्यामुळे या विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisement -

संबंधित शिक्षिकेने देखील त्या विद्यार्थ्यांना माफ केले असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी नरेश मेहता यांनी सांगितले. या मुलांनी एखादे मॉडेल बनवून ते सादर केले असते तर आम्ही त्यांचा सन्मान केला असता, पण आता हे प्रकरण धोक्याचा इशारा दर्शवत आहे. ही सर्व मुले यूट्यूबवरून हे सर्व शिकली होती, असे ते म्हणाले.

या घटनेनंतर संबंधित गावाची पंचायत बैठकही बोलावण्यात आली. त्यात मुलांच्या या धोकादायक प्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्या वर्गातील 15 पैकी 13 विद्यार्थ्यांचा यात समावेश असल्याचे समोर आले. इतर विद्यार्थ्यांनाही या सर्व प्रकाराची माहिती होती. त्यामुळ 13 विद्यार्थ्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यावर आणखी काही कारवाई करायची की नाही, याचा विचार सुरू आहे. (Haryana Crime: Action taken against students who placed bombs under the teacher’s chair)

हेही वाचा – RokhThok : एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ अमित शहांनी संपवला, संजय राऊतांचा निशाणा


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -