घरताज्या घडामोडीबेनामी संपती प्रकरणी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी

बेनामी संपती प्रकरणी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला दोषी

Subscribe

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना दिल्लीतील राऊज एवेन्यू कोर्टाने दोषी ठरवलं आहे.

उत्पनांपेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना दिल्लीतील राऊज एवेन्यू कोर्टाने दोषी ठरवलं आहे. चौटाला यांच्या शिक्षेवर २६ मे रोजी सुनावणी होणार आहे.

२०१० मध्ये दाखल करण्यात आले आरोपपत्र

- Advertisement -

याप्रकरणी सीबीआयने २६ मार्च २०१० साली चौटाला यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर १९९३ ते २००६ या कालावधीदरम्यान उत्पनापेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याकालावधीत त्यांच्यावर ६.०९ कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप होता.

ईडीने ३.६८ कोटींची संपत्ती केली जप्त

- Advertisement -

२०१९ साली ईडीने ओम प्रकाश चौटाला यांच्या ३ कोटी ६८ लाख किंमतीच्या संपत्तीवर टाच आणली होती. चौटाला यांच्या दिल्ली, पंचकुला आणि सिरसा येथील संप्ततीवर ही कारवाई करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -