घरताज्या घडामोडीबँकेत जाऊन पैसे काढण्याची चिंता सोडा; घरबसल्या पैसे मिळवा

बँकेत जाऊन पैसे काढण्याची चिंता सोडा; घरबसल्या पैसे मिळवा

Subscribe

लॉकडाऊमध्ये आता तुम्हाला घरच्या घरी बँकेतील पैसे काढता आणि भरताही येणार आहेत.

देशात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले असून प्रत्येक राज्याला कोरोनाने वेढले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरता देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आले आहे. परंतु, पैशाची गरज असल्यामुळे एटीएम किंवा बँकेत जाण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, आता पैसे आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागणार नाही. कारण तुम्हाला आता घरपोच पैसे काढता येणार आहेत आणि बँकेमध्ये भरताही येणार आहेत.

घरी बसून बँकेतील पैसे काढू शकता

हरयाणा सरकारने एक वेब पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून हरयाणामधील नागरिक घरी बसून बँकेत पैसे काढू शकतात किंवा जमा करु शकतात. तसेच नागरिक आपल्या सोयीनुसार टाइमस्लॉट सुद्धा बुक करु शकतात.

- Advertisement -

बँक टाइमस्लॉट बुक करण्याची प्रक्रिया

  • सर्वात आधी कोणत्याही ब्राऊजरमध्ये https://bankslot.haryana.gov.in वर लॉगइन करा.
  • त्यानंतर याठिकाणी ‘Book Your Bank Slot’ वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यामध्ये आपल्याला काही माहिती भरावी लागणार आहे.
  • या पेजवर आपले नाव, मोबाईल नंबर, बँकेचा आयएफएससी कोड भरावा लागणार आहे.
  • यासोबतच आपल्या सोयीनुसार तारीख आणि अप्वाइंटमेंटची वेळ निवडावी लागेल.
  • सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘apply for a bank slot’ वर क्लिक करावे.
  • यानंतर हे पोर्टल आपल्याला नवीन वेबपेजवर घेऊन जाईल, ज्याठिकाणी आपल्याला स्लॉट बुकिंगचे कन्फर्मेशन मिळेल.
  • स्लॉट बुकिंगमध्ये कन्फर्मेशनला तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह करुन ठेवू शकता.

हरयाणामधील कोणत्याही बँकेच्या शाखेत आपले खाते असेल तरच या सुविधेचा आपल्याला लाभ घेता येऊ शकतो. जर हरयाणा राज्याबाहेरील बँक खाते असेल तर, आपल्याला या सुविधेचा फायदा होणार नाही.


हेही वाचा – PMC बँकेचा वाली कोण? YES आणि PMC मध्ये भेदभाव का?


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -