घरदेश-विदेशअग्निवीरांना देश सेवेनंतर हरियाणा सरकारकडून नोकरी देण्याची हमी, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर...

अग्निवीरांना देश सेवेनंतर हरियाणा सरकारकडून नोकरी देण्याची हमी, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची घोषणा

Subscribe

हरियाणाच्या मुख्यंत्र्यांनी मंगळवारी याबाबत ट्वि़टरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून घोषणा केली की, "मी घोषित करतो की, अग्निपथ योजने अंतर्गत चार वर्ष देशाची सेवा केल्यानंतर सेनेतून परत आल्यावर अग्निवीरांना हरियाणा सरकारमध्ये नोकरी दिली जाईल"

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी घोषणा केली आहे की, अग्निपथ योजने अंतर्गत सेवा दिल्यानंतर अग्निवीरांना हरियाणामध्ये नोकरी देण्यात येईल. हरियाणाच्या मुख्यंत्र्यांनी मंगळवारी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून घोषणा केली आहे की, “मी घोषित करतो की, अग्निपथ योजने अंतर्गत चार वर्ष देशाची सेवा केल्यानंतर सेनेतून परत आल्यावर अग्निवीरांना हरियाणा सरकारमध्ये नोकरी दिली जाईल”.

हरियाणा सरकार पूर्वी मध्य प्रदेश सरकार, उत्तर प्रदेश सरकार, उत्तराखंड सरकारने सुद्धा अग्निवीरांची सेवा समाप्त झाल्यानंतर नोकरी देण्याची घोषणा केली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले होते की, “राज्याच्या सर्व युवकांना मी शाश्वती देतो की, प्रदेशातील जे युवक अग्निवीरच्या रूपात राष्ट्र सेवा करतील त्या सर्वांना भारत मातेच्या सेवेनंतर राज्याच्या पोलिस, आपतकालीन व्यवस्थापन, तसेच अन्य सरकार क्षेत्रांमध्ये नोकरी दिली जाईल. त्यामुळे तुम्ही सर्वजण कोणत्याही भ्रम परसवणाऱ्या बातम्यांपासून दूर रहा. तसेच ते म्हणाले होते की, आपले सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रतिबद्ध आहे”.

- Advertisement -

यासोबतच अग्निपथ योजनेसंबंधीत चालू असणाऱ्या हिंसक घटनांदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नाराज युवकांना आश्वासन दिले देत ट्विट केले की, “युवा मित्रांनो, अग्निपथ योजना तुमच्या आयुष्याला नवीन परिवर्तन प्रदान करण्यासोबतच भविष्याला आधार देईल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही भ्रमात अडकू नका. भारत मातेची सेवा करण्याच्या हेतुने आपले अग्निवीर राष्ट्राची अमूल्य ठेव असतील आणि उत्तर प्रदेश सरकार अग्निवारांना ४ वर्षानंतर पोलिस तसेच अन्य विभागात सरकारी नोकरी देण्यात येईल. मात्र या सरकारी योजनेचा खूप विरोध होत आहे. यूपी, बिहार सह अनेक राज्यांमध्ये युवकांनी मागणी केली आहे की, या योजनेला पुन्हा मागे घ्यावं आणि सामान्य भर्ती प्रक्रिया सुरू करण्यात यावी”.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -