घरताज्या घडामोडीहरियाणाचे मंत्री अनिल विज पॉझिटीव्ह, भारत बायोटेकची पहिली प्रतिक्रिया

हरियाणाचे मंत्री अनिल विज पॉझिटीव्ह, भारत बायोटेकची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

एकाबाजूला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी कोरोना संदर्भातील दिलासादायक बाब सांगितली. टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस म्हणाले की, ‘कोरोना लसीच्या चाचणीचा सकारात्मक परिणामाचा अर्थ असा आहे की, आता आपण कोरोना महामारी नष्ट होण्याचे स्वप्न पाहू शकतो.’ पण दुसऱ्याबाजूला आज कोरोनाची ‘कोवॅक्सिन’ लस देऊनही हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज कोरोनाचा पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

- Advertisement -

देशात वर्षा अखेर आणि नव्या वर्षाच्या सुरुवातील कोरोना लस येईल असे म्हटले जात आहे. पण दुसऱ्याबाजूला कोरोना लसीचा डोस देऊनही कोरोनाची लागण होत असल्याची चिंतेची बाब समोर आली आहे. भारतात तयार होणाऱ्या लसींपैकी ‘कोवॅक्सिन’ ही एक लस आहे. या स्वदेशी कोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी जेव्हा सुरुवात झाली होती. तेव्हा हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी स्वयंसेवक म्हणून ही लस घेतली होती. पण अनिल वीज कोरोनाग्रस्त आले आहेत. त्यांना अंबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २० नोव्हेंबरला अनिल वीज यांनी ‘कोवॅक्सिन’ लसीचा एक डोस घेतला होता. माहितीनुसार त्यांना १८ डिसेंबरला ‘कोवॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार होता. पण त्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी जरी दिलासादायक बाब सांगितली असली तरी त्यांनी असा इशारा दिला आहे की, ‘श्रीमंत आणि सामर्थ्यवान देशांनी लसीसंदर्भात गरीबांना आपेक्षा दाखवू नये.’

- Advertisement -

आता ‘कोवॅक्सिन’ लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे की, ‘लसीची चाचणी दोन डोसावर आधारित असते. कोरोना लसीचा प्रभाव दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनंतर दिसतो. एखाद्या व्यक्तीने दोन डोस घेतल्यानंतरच कोरोना लसीचा जास्त प्रभाव दिसून येतो.’


हेही वाचा – शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी करणार चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -