घरदेश-विदेशहरियाणातून 4 संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक; इनोव्हातून निघाले होते महाराष्ट्रात

हरियाणातून 4 संशयित दहशतवाद्यांना स्फोटकांसह अटक; इनोव्हातून निघाले होते महाराष्ट्रात

Subscribe

मिळालेल्या माहितीनुसार, करनाल येथील बस्तारा टोलनाक्यावरून एक इनोव्हा वाहन पोलिसांच्या पथकाने पकडले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे.

हरियाणातील कर्नालमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. या चारही दहशतवाद्यांकडून मोठ्याप्रमाणात शस्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ते पंजाबमधून दिल्लीच प्रवास करत होते. यावेळी चौघांनाही संशयित दहशतवादी म्हणून अटक केली आहे.हे चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्याजवळ एक गनपावडरचे कंटेनर देखील सापडले आहे. ही गनपावडर आरडीएक्स असल्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच त्यांच्याकडून तीन आयईडी बॉम्बही सापडले आहेत. आयबी पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांच्या अटकेची कारवाई केली.

संशयितांच्या वाहनात आणखी स्फोटके असण्याची शक्यता असल्याने रोबोच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. त्यांच्याकडे एवढ्या गोळ्या आणि गनपावडर मिळाले आहेत की हे लोक अनेक ठिकाणी मोठे गुन्हे करू शकले असते.

- Advertisement -

पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. यातील तीन संशयित दहशतवादी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि चौथा संशयित लुधियानाचा रहिवासी आहे. अटक करण्यात आलेले हे चार संशयित एक मोठी दहशतवादी घटना घडवण्याच्या प्रयत्नात होते. हे संशयित दहशतवादी दिल्लीमार्गे महाराष्ट्रातील नांदेडला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हे लोक हरविंदर सिंग उर्फ रिंडा यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंडा हा वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात लपला आहे. ही खेप कुठेतरी सोडण्याची जबाबदारी या चौघांवर सोपवण्यात आल्याचे समजते. या दहशतवादी नेटवर्कचे दुवे पाकिस्तानशी जोडले जाण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांना आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, करनाल येथील बस्तारा टोलनाक्यावरून एक इनोव्हा वाहन पोलिसांच्या पथकाने पकडले असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या ही गाडी मधुबन पोलीस ठाण्यात उभी आहे. तेथे बॉम्बशोधक पथक आहे. वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले आहेत. त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे करनाल टोल प्लाझाजवळ पोलीस बॅरिकेडिंग लावण्यात आले. तेथे त्यांना पकडण्यात आले. हे लोक मोठी दहशतवादी घटना घडवण्याचा कट रचत होते, असे मानले जात आहे.


Loudspeaker Row : लाऊडस्पीकर वादात आता लालूप्रसाद यादव यांची उडी, म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -