घरCORONA UPDATEदोन महिने पगार न मिळाल्यामुळे डॉक्टरने हॉस्पिटलसमोर टाकला चहाचा स्टॉल!

दोन महिने पगार न मिळाल्यामुळे डॉक्टरने हॉस्पिटलसमोर टाकला चहाचा स्टॉल!

Subscribe

अ‍ॅप्रन घालून चहा विक्री करणाऱ्या या व्यक्तीचे नाव गौरव वर्मा आहे.

हरियाणामधील एका डॉक्टराने आपल्या नवविवाहित पत्नीसोबत रस्त्याच्या कडेला चहाविक्रीचा उद्योग सुरु केला आहे. या डॉक्टरला गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्यामुळे त्याने चहाचा स्टॉल सुरू केला आहे. या तरुण डॉक्टरने रुग्णालय प्रशासनाकडे दोन महिन्यांपासून पगार मिळाला नसून तो देण्यात यावा अशी मागणी केली. प्रशासनाने आपल्याला नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोप या डॉक्टराने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टरांचा अ‍ॅप्रन घालून चहा विक्री करणाऱ्या या व्यक्तीचे नाव गौरव वर्मा आहे. गौरवच्या म्हणण्यानुसार त्याला दोन महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाहीये. या बदलीचा विरोध केला असता मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आला असं आरोप त्याने केला आहे. रुग्णालय ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीमधील वरिष्ठांशी त्याने संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. मात्र माझं कोणतही म्हणणं ऐकून घेण्यात आलं नी असं गौरव म्हणाला. पगारबद्दल चौकशी करताच गौरवची बदली गाझियाबादमधील कंपनीच्या दुसऱ्या रुग्णालयात करण्यात आली. याला विरोध केल्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याचे पत्रच गौरवला मिळालं. गौरवने या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे तक्रारार केली आहे. पण काहीच उपयोग न झाल्यामुळे त्याने चहाची टपरी टाकली.

- Advertisement -

म्हणून चहाची टपरी सुरू केली

नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर गौरवने सेक्टर १३ मध्ये चहाची टपरी सुरु केली आहे. या टपरीवर आपल्या बायकोबरोबर चहा विकताना दिसत आहे. तो डॉक्टरचा अ‍ॅप्रन घालून चहा विकतो आहे. त्याचबरोबर गौरवने सरकारकडे रुग्णलयावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकराबाबात डॉक्टर अश्विनी अहूजा म्हणाले की, या प्रकरणाची आपल्यापर्यंत तक्रार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणासंदर्भात सध्या मी कोणतेही मत देणं चुकीच आहे. या प्रकरणाची चौकशी करून मी मत व्यक्त करेन. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे, अशी माहिती अश्विनी यांनी दिली.

- Advertisement -

गौरवचा दावा चुकीचा

गौरव यांना अनेकदा बेकायदेशीर काम करताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. या संदर्भात त्यांना तीन ते चार नोटीस पाठवून अनेकदा समजही देण्यात आली आहे. कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गौरवला भेटण्यास बोलवले पण गौरवने भेटण्यास नकार दिला. गौरवला रुग्णालय प्रशासनाशी काही अडचण असल्याच बसून चर्चा करुन यासंदर्भातील उपाय शोधता येईल असं मत रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.


हे ही वाचा – सेवानिवृत्त सासरा सुनेच्या डोक्यावर बंदूक ठेवून करायचा वारंवार बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -