घरताज्या घडामोडीपश्चिम बंगालच्या निवडणुकांचे वेळापत्रक मोदी, शहांनी दिले काय ? ममता दीदींचा सवाल

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे वेळापत्रक मोदी, शहांनी दिले काय ? ममता दीदींचा सवाल

Subscribe

चार राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाकडून जाहीर होताच, ममता बॅनर्जी आपल्या स्टाईलमध्ये या वेळापत्रकावर कडाडून टीका केली आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका म्हणजे एक प्रकारचे कटकारस्थान असल्याचे सांगत त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमधील काही सूत्रांकडूनच मिळालेल्या निवडणुकीच्या यादीमध्ये हे स्पष्ट झाले आहे. भाजपला कशा पद्धतीने निवडणुका हव्या होत्या त्यानुसार केंद्रीय निवडणुक आयोगाने या तारखांची घोषणा केली असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. आता हीच यादी सर्वसामान्यांपर्यंतही पोहचली असल्याचे त्या म्हणाल्या. हे सगळ पाहून मला खूपच धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या तारखा या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी निश्चित केल्या का ? असाही सवाल त्यांनी केला आहे.

पश्चिम बंगाललमध्ये मतदान प्रक्रियेला २७ मार्चला सुरूवात होणार आहे. पण तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात निवडणुक होणार आहे. त्यासाठी ३३ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. शिवाय मतदानाचा निकाल हा २ मे रोजी घोषित होणार आहे. संपुर्ण देशात मी एकटीच महिला मुख्यमंत्री आहे. होय, मी नक्कीच जिंकेन असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर मोदी आणि अमित शहांना पुन्हा २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जायचे आहे. याचे परिणाम तुम्हाला नक्कीच दिसतील असेही त्यांनी खडसावले. बंगालमध्ये याआधी सात टप्प्यात विधानसभा निवडणुक २०१६ मध्ये आणि लोकसभेच्या निवडणुका या २०१९ मध्ये पार पडल्या होत्या. आता केंद्रीय निवडणुक आयोगाने आणखी दोन टप्प्यांची भर पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसेची शक्यता असल्यानेच केंद्रीय निवडणुक आयोगाकडून आणखी दोन टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था पाहता तसेच सुरक्षा बलांचा प्रवास पाहता आम्ही आणखी दोन टप्पे वाढवण्याचा निर्णय़ घेतल्याचे केंद्रीय निवडणुक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केले. याआधीही २०१६ आणि २०१९ मध्ये सात टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे खूपच टप्पे वाढले असे म्हणता येणार नाही असेही निवडणुक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisement -

पण ममता बॅनर्जी यांनी मात्र भाजपनेच केंद्रीय निवडणुक आयोगाला पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे वेळापत्रक दिले असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. इतर राज्यातही जिथे एकाच दिवसात निवडणुकांसाठीच्या जागा सारख्या आहेत, मग पश्चिम बंगालमध्येच टप्पे का वाढवण्यात आले असा सवाल ममता दीदींनी केला आहे ? ज्याठिकाणी आमची ताकद आहे त्या जिल्ह्यातच अर्धा अर्धा जिल्हा याप्रमाणे निवडणुक लावण्यात आली आहे. यासाठी मोदी आणि अमित शहा यांचा सल्ला होता का ? असा सवाल ममता दीदींनी केला आहे. आसाम आणि तामिळनाडूतील निवडणुका संपल्यानंतर मोदी आणि अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये येणार आहेत का ? असा सवाल ममता दीदींनी केला आहे. आम्ही तळागळाचे लोक आहोत, त्यामुळे आम्ही नक्कीच तुम्हाला पराभवाची धूळ चारू अशा शब्दात त्यांनी भाजपला आव्हान दिले आहे. मी पश्चिम बंगालची बेटी आहे. गेल्या ४० वर्षांपासून मी राजकारणात आहे. मला प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येत विधानसभा निवडणुकीची जागा माहिती आहे. तुम्ही जो काही कट रचाल तो मी उधळून लावीन. पश्चिम बंगालचे लोकच पश्चिम बंगालवर राज्य करतील. जनता आठ टप्प्यातील निवडणुकांचा नक्कीच समाचार घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -