घरदेश-विदेशकर्नाटकमध्ये तीन वाहनांच्या जोरदार धडकेत 9 जणांनी गमावला जीव

कर्नाटकमध्ये तीन वाहनांच्या जोरदार धडकेत 9 जणांनी गमावला जीव

Subscribe

कर्नाटकातील हसन येथे टेम्पो ट्रॅव्हलर, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि दूधाच्या वाहनात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. धर्मस्थळ, सुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देत टेम्पो ट्रॅव्हलरमधून भाविक परतत होते, यावेळी अर्सिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर वाहन, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि KMF दूध वाहन यांच्यात जोरदार धडक झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक पथक घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, गांधीनगरजवळील अर्सिकेरे तालुक्यात ही घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर, कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि केएमएफच्या दुधाचे वाहन वेगात होते असे सांगितले जात आहे. यावेळी तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.

टेम्पो ट्रॅव्हलरमधील लोक धर्मस्थळ, सुब्रमण्यम आणि हसनंबा या देवस्थानांना भेट देऊन घरी परतत होते, असे तपासात समोर आले आहे. यावेळी अचनाक हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती पीडित कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेत टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुधाच्या टँकरचा चक्काचूर झाला आहे. तर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसचेही नुकसान झाले आहे. या घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


रेती घाटांचा काळाबाजार करणाऱ्या अधिकारी आणि नेत्यांना थेट तुरुंगात टाकणार; फडणवीसांचा सज्जड इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -