Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Hate speech : कोणीही असो द्वेषपूर्ण भाषणाबाबत एकच भूमिका, सुप्रीम कोर्टाने केले...

Hate speech : कोणीही असो द्वेषपूर्ण भाषणाबाबत एकच भूमिका, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

Subscribe

नवी दिल्ली : आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. कोणतीही बाजू असो, सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे, अशी टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केली. कोणत्या पक्षाने काय म्हटले आहे, हे पाहणार नाही. द्वेषपूर्ण भाषण करणारे कोणीही असोत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. आम्ही आधीच याबाबतची आमची काही मते व्यक्त केली आहेत. याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

द्वेषपूर्ण भाषण आणि नूंह येथील जातीय हिंसाचाराशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज, शुक्रवारी सुनावणी झाली. एका याचिकेत निषेध रॅलींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे, तर, अन्य याचिकेत मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार टाकण्याविषयी केलेल्या आवाहनाची तक्रार करण्यात आली आहे.

- Advertisement -

हरियाणातील नूह येथे 31 जुलै रोजी विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेवर जमावाने दगडफेक केल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. या हल्ल्यानंतर नूहपासून ते गुरुग्राम, पलवलसारख्या भागांत हिंसाचाराचे लोण पसरले. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
केरळमध्ये आययूएमएलने (IUML) एक रॅली काढली होती आणि त्या दिवशी त्यांनी हिंदूंच्या हत्येबाबत घोषणाबाजी करण्यात आली होती, अशी माहिती एका वकिलाने दिली. यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, एक बाजू असो किंवा दुसरी, त्यांना एकाच प्रकारची वागणूक दिली गेली पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. जिथे द्वेषपूर्ण भाषण असेल तिथे कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हरियाणातील नूहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महापंचायतीमधील मुस्लिमांविरुद्ध बहिष्कार मोहिमेविरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. आम्हाला आशा आहे की द्वेषयुक्त भाषणाबाबत न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे या प्रकरणात पालन केले गेले असेल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे व्यक्त केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 25 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
यापूर्वी अन्य प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
द्वेषपूर्ण भाषणांवर सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका प्रकरणाच्या सुनावणीत देशभर निर्बंध लागू केले आहेत. 2022मध्ये फक्त तीन राज्यांपुरतेच हे निर्बंध लागू करण्यात आले होते, पण नव्या आदेशानुसार खालच्या पातळीवर, एकमेकांच्या व्यंगावर किंवा इतर कोणत्याही प्रकारे आता भाषणे करणाऱ्यांवर कोणी तक्रार केली नाही तरी देखील प्रशासनाला गुन्हा दाखल करावा लागणार आहे. द्वेषयुक्त भाषणांवर न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि बीव्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने हे निर्बंध आणले होते. द्वेषयुक्त भाषणांना या दोन्ही न्यामूर्तीनी ‘देशाच्या धार्मिक रचनेला हानी पोहोचवणारे गंभीर गुन्हे’ असे संबोधले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -