घरदेश-विदेशVideo : त्या पीडितेवर पोलिसांकडून रातोरात अंत्यसंस्कार; योगी सरकारवर काँग्रेसची टीका

Video : त्या पीडितेवर पोलिसांकडून रातोरात अंत्यसंस्कार; योगी सरकारवर काँग्रेसची टीका

Subscribe

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या मृत्यूनंतर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह गावी आणला. मात्र, गावकरी आणि पीडिती कुटुंबीयांच्या विरोधानंतरही पोलिसांनी रातोरात या पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यासंबंधीचे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले असून सोबत त्यांनी घटनास्थळाचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तसेच या प्रकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारतातील एका मुलीचा बलात्कार करून तिची हत्या केली जाते. त्यानंतर हे सत्य दडवले जाते. इतकेच नव्हे तर कुटुंबियांकडून तिच्यावरील अंत्यसंस्काराचा अधिकारदेखील हिरावला जातो. हे अपमानकारक तसेच अन्यायकारक आहे, असे राहुल गांधी यांनी ट्विटरमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

या पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने युपी पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा दावा केला आहे. पोलिसांना वारंवार मृतदेह घरी आणला जावा यासाठी विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप कुटुंबाने केला आहे.

आज केंद्रात मंत्री असलेले निर्भया प्रकरणात रस्त्यावर उतरले होते. पण मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारची घटना जेव्हा घडते, तेव्हा सगळे शांत बसतात. अशा घटनांशी सरकारचा संबंध नसतो. पण व्यवस्थेचं काम तपास करून गुन्हेगारांना शिक्षा देणं असतं. या प्रकारच्या घटना देशात वाढत असताना कायद्याची भिती मरत चालली आहे.
– संजय राऊत, खासदार

- Advertisement -

तसेच काँग्रेस आणि आपमधील इतर नेत्यांनीही या प्रकरणी युपी सरकारवर निशाणा साधला असून उत्तर प्रदेश पोलिसांचे हे कृत्य भ्याडपणाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्दयतेची ही परिसीमा आहे, ज्या वेळी सरकारने संवेदनशील व्हायला हवे होते, त्या वेळी सरकारने निर्दयतेच्या मर्यादा ओलांडल्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. आम आदमी पक्षानेदेखील अंत्यसंस्काराचा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केला आहे.

आम्ही पोलिसांना सांगितले की आम्ही सकाळी अंत्यसंस्कार करू. पण ते घाईत होते आणि आम्हाला त्वरित करायला भाग पाडत होते. ते म्हणाले की २४ तास गेले आहेत आणि शरीर विघटनशील आहे. आम्हाला हे सकाळी करायचे होते कारण तोपर्यंत आणखी नातेवाईक आले असते, असे पीडितेच्या भावाने म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांची एसआयटी स्थापन केली असून त्यांनी सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेस देण्यात आले आहेत. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

चिंताजनक! देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -