घरताज्या घडामोडीHathras Rape Case: प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला प्रशासनाकडून धमक्या

Hathras Rape Case: प्रकरण मिटवण्यासाठी पीडितेच्या कुटुंबाला प्रशासनाकडून धमक्या

Subscribe

हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांनी हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच पीडित कुटुंबियांनी प्रशासनाने धमकी देऊन दबाव आणल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातला एक व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये हाथरसचे जिल्हाधिकारी पीडित कुटुंबाला धमकी देताना दिसत आहेत. ‘काही दिवसात मीडिया निघून जातील. त्यानंतर प्रशासन इथेच आहे,’ असे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार व्हिडिओत बोलताना दिसत आहेत. दरम्यान पोलीस प्रशासनाकडून धमकावले जात असून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप देखील हाथरसच्या पीडित कुटुंबियांनी केला आहे.

व्हिडिओमध्ये हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार पीडित कुटुंबातील सदस्याशी बोलताना दिसत आहेत. ते व्हिडिओत म्हणत आहेत की, ‘तुम्ही आपली विश्वासार्हता गमावू नका, अर्धे मीडिया निघून गेले आहेत, उद्या सकाळी अजून अर्धे जातील, उद्या संध्याकाळी दोन-चार उरतील. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. आता तुमचा जबाब बदलायचा की नाही ही तुमची इच्छा आहे.’

- Advertisement -

#हाथरस #DM प्रवीण कुमार ने हाथरस की पीड़ित लड़की के पिता को दी धमकी

#बेशर्मी_की_भी_हद_होती_है#हाथरस DM की धमकी…प्रवीण कुमार ने हाथरस की लड़की के पिता को दी धमकी कहा मीडिया आज यहॉं है, कल नहीं रहेगी, सब चले जायेंगे, आप सरकार की बात मान लो, आप बार बार बयान बदल कर ठीक नहीं कर रहे हैं, आपकी इच्छा है, क्या पता कल हम ही बदल जायें.!

Posted by Shahzada Kaleem on Thursday, October 1, 2020

पीडितेच्या वहिनीने केला आरोप

‘जर तुमची मुलगी कोरोनामुळे मरण पावली असती तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली असती?, असे आम्हाला सांगण्यात आले. तसेच आम्हाला सतत धमक्या मिळत आहेत. वडिलांना धमकावले जात आहे. त्यावेळीची परिस्थिती अशी होती की, जे काही मनात येईल ते आम्ही बोलत होता, आता हे लोक आम्हाला इथे राहू देणार नाहीत’, असा पीडितेच्या वहिनीने आरोप केला आहे.

- Advertisement -

‘तरुणीवर बलात्कार झाला नाही’

दरम्यान ‘हाथरसच्या तरुणीवर बलात्कार झाला नाही’, असा दावा आतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी केला आहे. गळ्यावर झालेली गंभीर दुखापती आणि धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालातूनही स्पष्ट झाले आहे. हिंसा करण्यासाठी अफवा पसरवली जात आहे, असे प्रशांत कुमार म्हणाले आहेत.


हेही वाचा – Hathras Rape Case: आज ते लोक गप्प का? राज ठाकरे कडाडले


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -