घरताज्या घडामोडीHathras Rape Case: 'अशी शिक्षा देऊ की उदाहरण प्रस्थापित होईल' - योगी...

Hathras Rape Case: ‘अशी शिक्षा देऊ की उदाहरण प्रस्थापित होईल’ – योगी आदित्यनाथ

Subscribe

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरातून असंतोष व्यक्त होत आहे. सेलिब्रिटी, राजकारणी आणि सामान्य जनता आपला संताप व्यक्त करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरसमध्ये जाण्यापासून रोखल्यामुळे हा युपी सरकारवर जोरदार टीका होत आहे. त्यातच आज माध्यमांनाही हाथरसमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आहे. सगळ्या बाजूंनी घेरल्यानंतर अखेर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. आज दुपारी ट्विट करुन आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देऊ, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

योगी आदित्यनाथ लिहितात की, “उत्तर प्रदेशमध्ये माता-भगिनींचा सन्मान-स्वाभिमानाला हानी पोहोचवणाऱ्यांचा समूळ नाश निश्चित आहे. यांना अशी शिक्षा मिळेल की भविष्यात उदाहरण प्रस्थापित होईल. आपले उत्तर प्रदेश सरकार माता-भगिनींच्या सुरक्षा आणि विकासासाठी कटिबद्ध आहे.”

- Advertisement -

हाथरसमधील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातील भाजप विरोधकांनी रान पेटवले आहे. त्यात युपी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेवर देखील टीका होत आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हाथरस येथे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हाथरसमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर नाकेबंदी लावून ठेवलेली आहे. त्यामुळे राज्याराज्यांमध्ये आता युपी पोलिसांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेनेची आणि कर्नाटकमध्ये डाव्या पक्षांची आंदोलने झाली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

१४ सप्टेंबर रोजी हाथरस गावात एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जबर मारहाण करण्यात आली. तिच्या शरिरावर अनेक गंभीर जखमा आणि फ्रॅक्चर आले होते. या जखमांमुळे तिच्या शरिराचा काही भाग पॅरालाईज झाला होता. गळ्यावर जखम झाल्यामुळे तिला श्वास घेण्यास अडचण येत होती. आपल्या मुलीसोबत इतक्या गंभीर गोष्टी झाल्यानंतर आधीच तणावात असलेल्या परिवाराला आणि दुःख झाले जेव्हा पोलिसांनी तिचे शवावर परस्पर अंत्यसंस्कार केले. पोलिसांच्या या कृत्यावर देशभरातून टीका होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -