घरताज्या घडामोडी'अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत', राहुल गांधींची योगींवर...

‘अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत’, राहुल गांधींची योगींवर टीका

Subscribe

हाथरसच्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरुन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एका योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघातील टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन हे लज्जास्पद सत्य आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांना हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेवर बलात्कार झाल्या नसल्याचे म्हटले आहे. यामुळेचे योगी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, हे लज्जास्पद सत्य आहे की, अनेक भारतीय दलित, मुस्लिम आणि आदिवासींना माणूस समजत नाही आहेत. मुख्यमंत्री आणि पोलीस म्हणतात की, कोणाचा बलात्कार झाला नाही आहे, कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती पीडित कोणीही नाही आहे.

- Advertisement -

बीबीसीचा वृत्त शेअर करत राहुल गांधींनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसीच्या या वृत्तात दिले आहे की, पोलीस आणि राज्यसरकारचे अधिकारी सातत्याने बलात्कारची घटना नसल्याचे सांगत आहेत.

- Advertisement -

दरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरसच्या बलात्कार प्रकरणावरुन सुरुवातीपासून उत्तर प्रदेशाच्या सरकारवर टीका करत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही पीडित मुलीच्या घरी गेले होते. यादरम्यान राहुल गांधी म्हणाले होते की, ‘यूपी सरकार पीडित कुटुंबासमवेत मनमानी पद्धतीने काहीही करू शकणार नाही, कारण आता संपूर्ण देश या मुलीला न्याय देण्यासाठी उभा आहे.’


हेही वाचा – Hathras Case : सीबीआय करणार हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -