घरताज्या घडामोडीVideo: प्रियांका गांधींची गळाभेट घेताना हाथरस पीडितेच्या आईचे अश्रू अनावर

Video: प्रियांका गांधींची गळाभेट घेताना हाथरस पीडितेच्या आईचे अश्रू अनावर

Subscribe

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा अखेर शनिवारी सायंकाळी ७.२५ मिनिटांच्या दरम्यान उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये दाखल झाले. कथित सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या घरी दाखल होत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. एका बंद खोलीत राहुल – प्रियांका यांनी पीडित कुटुंबियांशी बातचीत करताना त्यांचं दु:ख जाणून घेतलं. यावेळी प्रियांका यांनी पीडितेच्या आईला घट्ट मिठी मारत त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या भेटीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

- Advertisement -

या भेटीनंतर प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. या पाच प्रश्नांची यादी त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललयानंतर ट्विट केली आहे. ‘या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच कुटुंबाला धमकी देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना निलंबित करण्यात यावे अशी पीडित कुटुंबियांची इच्छा आहे. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचे पाहताही आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार’ असे प्रियांका गांधी पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर म्हणाल्या.

- Advertisement -

खासदार राहुल गांधी यांनी देखील पीडित कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर ट्विट केले आहे. “हाथरस पीडित कुटुंबियांना भेटलो. त्यांचे दुःख समजून घेतले. मी त्यांना विश्वास दिला की या कठिण प्रसंगात आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. त्यांना न्याय देण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार. आता उत्तर प्रदेश सरकार काहीच मनमानी करु शकणार नाही. कारण आता देशाच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुर्ण देश उभा आहे.”

या दरम्यान, ‘आम्ही सध्या सुरू असलेल्या चौकशीने संतुष्ट नाही. कारण आम्हाला अद्याप प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. ज्या जिल्हा दंडाधिकार्‍यांनी कुटुंबाला खुलेआम धमकी दिली त्यांनाही अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही’, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -