घरदेश-विदेशचक्क एक कोटी शिवलिंग असलेलं अद्भूत मंदिर पाहिलत का!

चक्क एक कोटी शिवलिंग असलेलं अद्भूत मंदिर पाहिलत का!

Subscribe

एक कोटी शिवलिंग असलेलं हे अद्भूत मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि भाविक येथे गर्दी करतात.

आपल्या देशात भगवान शिव यांची अनेक सुंदर मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळते. पण भारतात एक असही आगळंवेगळं मंदिर आहे ज्यात फक्त एक-दोन नाहीतर चक्क एक कोटी शिवलिंग आहेत. हे अद्भूत मंदिर कर्नाटक येथे असून या शिव मंदिरामधील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी लोक दूरदुरुन येतात. या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. दिवसेंदिवस या मंदिरातील शिवलिंगांची सख्या ही वाढत जाते यामागील कारण म्हणजे ज्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते ते येथे एक शिवलिंग स्थापन करतात. श्रावण आणि महाशिवरात्रीला ही संख्या दुप्पट होते. परदेशातून लोक इथे येतात. देशातील सर्वांत उच्च शिवलिंगापैकी एक असलेल्या या मंदिराची उंची १०८ फूट इतकी आहे. याच शिवलिंगाच्या चारही बाजूने एक छोटे छोटे शिवलिंग स्थापन केले आहेत.या सोबतच श्री गणेशा आणि कुमारस्वामी यांच्याही प्रतिमा आहेत. याचबरोबर ३५ फूट उंच, ६० फूट लांब आणि ४० फूट रुंद नंदीची मूर्तीही आहे.

एक कोटी शिवलिंग असलेल्या मंदिराची पार्श्वभूमी

साधारण एक कोटी शिवलिंग असलेलं हे मंदिर कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिर आहे. जेव्हा भगवान इंद्राला गौतम नावाच्या एका साधून श्राप दिला होता तेव्हा त्यातून मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी कोटिलिंगेश्वर मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली होती. या श्रापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान इंद्राने येथील शिवलिंगांचा अभिषेक १० लाख नद्यांच्या पाण्याने केला होता. तेव्हापासून हे मंदिर भाविकांसाठी श्रध्देचं स्थान मानले जाते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी सिवलिंगाची स्थापनारंगीबेरंगी दगडांवर ठेवलेल्या या शिवलिंगांना पाहणे एक वेगळाच अनुभव देतं.

- Advertisement -

हे वाचा- Reliance Jio ने लाँच केली नवी JioBusiness सेवा; ५ कोटी MSME होणार फायदा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -