Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमHC about Hindu Religion : ...एवढा हिंदू धर्म कमकुवत नाही, केरळ हायकोर्टाची...

HC about Hindu Religion : …एवढा हिंदू धर्म कमकुवत नाही, केरळ हायकोर्टाची टिप्पणी

Subscribe

निर्देशांचे पालन केल्यास उत्सवात सहभागी असलेल्या हत्तींची संख्या मर्यादित राहील. परिणामी, प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या उत्सवाची परंपरा बाधित होईल, असा युक्तिवादही बोर्डाकडून करण्यात आला. तथापि, न्यायालायने याच्याशी सहमती दाखवली नाही.

(HC about Hindu Religion) कोची : धार्मिक कार्यक्रमांदरम्यान हत्तींच्या मिरवणुकीशी संबंधित याचिका केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. वास्तविक, सीडीएम अर्थात कोचीन देवसोम बोर्डाने मंदिर उत्सवादरम्यान हत्तींमध्ये किमान तीन मीटरचे अंतर राखण्याच्या आदेशातून सवलत मागितली होती. मात्र, ती नाकारताना प्राण्यांच्या हिताच्या दृष्टीने हे निर्देश आवश्यक असल्याचे न्यायालयाचे सांगितले. (Important comment of Kerala High Court about Hindu religion)

तिरुपुनिथुरा येथील मंदिरात उत्सवादरम्यान मिरवणुकीत हत्तींचा वापर करताना दोघांमधील अंतराच्या निर्देशात सूट मिळावी यासाठी सीडीबीने न्यायालयात याचिका केली होती. न्यायमूर्ती ए के जयशंकरन नांबियार आणि न्यायमूर्ती गोपीनाथ पी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. संवैधानिक सिद्धातांच्या अनुरूप या प्रथा असायला हव्यात, अशी टिप्पणी या खंडपीठाने केली. 15 हत्तींची मिरवणूक ही या उत्सवाचाच एक अभिन्न भाग असल्याचा युक्तिवाद बोर्डाचे वकील के पी सुधीर यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्रिपद सोडले आणि शिंदेंनी भाजपाकडे मागितले थेट गृह खाते, दिल्लीत काय घडले?

कोणत्याही धर्मग्रंथात हत्तीच्या वापराचा उल्लेख नसेल तर त्याचा अर्थ, ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. हत्तींचा सहभाग नको, असे आम्ही म्हणत नाही. लोकांची श्रद्धा आणि धार्मिक भावना जपण्यासाठी हत्तींचा सहभाग असणे ठीक आहे, पण दोन हत्तींमध्ये किमान 3 मीटरपेक्षा कमी अंतर ठेवणं योग्य आहे, हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल, असे न्यायमूर्ती नांबियार म्हणाल्याचे बार अँड बेंच या वेबसाइटने म्हटले आहे.

- Advertisement -

निर्देशांचे पालन केल्यास उत्सवात सहभागी असलेल्या हत्तींची संख्या मर्यादित राहील. परिणामी, प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या उत्सवाची परंपरा बाधित होईल, असा युक्तिवादही बोर्डाकडून करण्यात आला. तथापि, न्यायालायने याच्याशी सहमती दाखवली नाही. हत्तींचा सहभाग नसेल तर कोलमडून पडेल एवढा हिंदू धर्म कमकुवत आहे, हे आम्ही मान्य करणार नाही, असे न्यायमूर्ती नांबियार म्हणाले. तर, न्यायमूर्ती गोपीनाथ म्हणाले की, ‘हत्तींशिवाय धर्माचे अस्तित्वच नसेल, असे तुम्ही दाखवून देऊ शकत नाही तोपर्यंत अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा प्रश्नच उद्भवत नाही.

या प्रकरणात, मिरवणूक किंवा उत्सवाच्या दरम्यान प्राण्यांना कठिण परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे न्यायालयाचा भर हत्तींच्या हितावरच आहे, असे न्यायालय स्पष्ट केले. खंडपीठाने 13 नोव्हेंबर रोजी क्रूरता रोखण्यासाठी अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यामध्ये सण आणि मिरवणुकीच्या वेळी दोन हत्तींमध्ये किमान तीन मीटर अंतर ठेवण्याचे नमूद करण्यात आले आहे. (HC about Hindu Religion : Important comment of Kerala High Court about Hindu religion)

हेही वाचा – Thackeray group Vs BJP : देशातील सार्वजनिक संपत्तीचे मालक अदानी, ठाकरे गटाचा हल्लाबोल


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -