घरताज्या घडामोडीग्राहकांना मोठा झटका! गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत HDFC आणि PNB बँकेचा मोठा...

ग्राहकांना मोठा झटका! गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ करण्याबाबत HDFC आणि PNB बँकेचा मोठा निर्णय

Subscribe

गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ होण्याबाबत HDFC आणि PNB बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. जून या महिन्याला सुरूवात झाली असून हा निर्णय या दोन्ही बँकेकडून लागू केला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा भुर्दंड भरावा लागू शकतो. गृहकर्जावरील रिटेल प्राईम रेटमध्ये HDFC बँकेने वाढ केली आहे. हा नवीन नियम १ जूनपासून लागू होणार आहे.

HDFC बँकेनंतर पीएनबी बँकेने देखील आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. पीएनबी बँकेने आपल्या कर्जाच्या व्याज दरात १५ बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे. तसेच याचा परिणाम पीएनबीच्या सर्व प्रकारच्या कर्जांवर होणार आहे.

- Advertisement -

रिझर्व्ह बँकेने मागील दोन महिन्यांमध्ये ०.४० टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो रेट ४.४० टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर देशातील अनेक बड्या बँकांनी आपल्या कर्जादारांमध्ये वाढ केली आहे. यापूर्वी देखील एसबीआयने आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली होती.

- Advertisement -

ग्राहकांवर होणार हप्त्यांचं ओझं

बँकेने आपल्या NEFT आणि RTGS व्यवहारांच्या शुल्कात वाढ केली आहे.तर NACH ने देखील ई-मॅडेट चार्जेस रिव्हाईज करण्यात आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांसाठी २४ रूपये करण्यात आला आहे. तर यापूर्वीचे जर आपण शुल्क पाहिले तर शुल्क २० रुपये इतकं होतं. मात्र, पाच लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या आरटीजीएस शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आरटीजीएस शुल्कात वाढ करून ते ४९.५० रूपये करण्यात आलं आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनविषयक धोरण समितीची बैठक बोलावली होती. यात रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली गेली. त्यानंतरच बँकांकडून व्याजदरात वाढ करण्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक आता ६ ते ८ जून रोजी होणार आहे.


हेही वाचा : National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स, ८ जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -