HDFC बँक ग्राहक डेबिट कार्ड वापरू शकणार नाही

HDFC बँकेचे खातेदार असाल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकणार नाही.

HDFC_Bank
HDFC बँक ग्राहक डेबिट कार्ड वापरू शकणार नाही

जर HDFC बँकेत तुमचेही खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण ४ फेब्रुवारीला रात्री १२. ३० ते पहाटे ५ पर्यंत बँकेची डेबिट कार्ड सेवा बंद असणार आहे. HDFC ने आपल्या ग्राहकांसाठी याबद्दल सूचना जारी केली आहे. त्यात संबधित सूचना देण्यात आली आहे. देखभाल प्रक्रियेसाठी HDFCचे क्रेडीट कार्ड व्यवहार या कालावधीत बंद राहणार आहेत.

२०२० मध्ये ७ हजार ४१६.४८ कोटींचा लाभ

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार HDFCने तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला आहे. यात २०२० मध्ये बँकेला निव्वळ लाभ ७ हजार ४१६.४८ कोटी झाला होता. तर या तिमाहीत १५.१ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे.


हेही वचा – सरकारच्या ‘भिंतीमुळे’ शेतकऱ्यांचे पाण्याविना हाल, आंदोलन चिघळणार