घरताज्या घडामोडीब्रम्हाकुमारी प्रमुख दादी जानकी यांचं निधन

ब्रम्हाकुमारी प्रमुख दादी जानकी यांचं निधन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

ब्रम्हाकुमारी संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे शुक्रवारी पहाटे २ वाजता निधन झाले. त्यांचे १०४ वर्षे वय होते. महिला साधिकांच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मीक संस्थेच्या त्या प्रेरणास्थान होत्या. माउंट अबू येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील दोन महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा व पोटाच्या विकारांचा त्रास होता. ब्रह्माकुमारीचे मुख्यालय शांती वन येथे त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. ब्रह्माकुमारीचे प्रमुख राजयोगिनी दादी जानकी जी यांनी परिश्रमपूर्वक समाजाची सेवा केली.त्यांनी इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. महिला सबलीकरणाच्या दिशेने त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते. माझे विचार या दु:खी समयी त्यांच्या असंख्य अनुयायांसोबत आहेत. ओम शांती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


हेही वाचा – धक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले

राजयोगिनी दादी यांचा जन्म १ जानेवारी १९१६ रोजी हैद्राबाद सिंध (सध्या हा प्रांत पाकिस्तानात आहे) येथे झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षी त्या या संस्थेशी जोडल्या होत्या. ब्रम्हाकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांच्या निधनानंतर त्या २७ ऑगस्ट २००७ रोजी संस्थेच्या प्रमुख प्रशासक झाल्या. सध्या या संस्थेत सुमारे ४६ हजार महिला साधिका समाजकार्य करत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -