Corona: रक्त तपासणीत कळणार कोरोनाचा धोका

health a simple bood test may detect risk of severe coronavirus infection
Corona: रक्त तपासणीत कळणार कोरोनाचा धोका

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक संशोधन केली जात आहेत. यादरम्यान कोरोना संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ‘एका सोप्या रक्त तपासणीत कोरोना विषाणूचा धोका किती आहे हे समजू शकेल.’

शास्त्रज्ञांनी रक्तामध्ये एक विशेष गोष्ट ओळखली आहे, ज्यामुळे कोरोना विषाणूचा लागण झालेल्या लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ५ ते १० पट वाढते, असे समोर आले आहे. फिंलँड बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या नाइटेंगेल हेल्थमधील वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या कोरोनाच्या लसीची अधिक गरज आहे. अशा लोकांना या ब्लड टेस्टचा उपयोग जास्त होईल. यामुळे त्यांना प्राथमिकतेनुसार लस उपलब्ध करून दिली जाऊ शकते.

ते म्हणाले की, ‘निरोगी लोकांना ओळखणे हे जागतिक आरोग्याची प्राथमिकता झाली आहे, ज्यामध्ये गंभीर कोविड-१९मुळे आजार पडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे.’ या अभ्यासातील संशोधकांना समजले की, ‘रक्तामधील निर्देशक सांगू शकतात की, कोणत्या व्यक्तीला न्यूमोनिया आणि कोविड-१९ सारख्या आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्याची अधिक गरज आहे.’

यासाठी त्यांनी युके बायोबँकमधील एका लाखांहून अधिक रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले आणि रक्तात असलेल्या त्या विशिष्ट अणू निर्देशक ओळखले. ज्यामुळे कोरोना विषाणूचा होण्याचा अधिक धोका कोणाला आहे हे समजू शकेल. ज्या लोकांच्या रक्तात हे अणू निर्देशक आहेत. त्या लोकांचा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका पाच ते दहा पट वाढतो. त्यामुळे आता ही कंपनी एक रक्त तपासणी सुरू करणार आहे. ज्यामध्ये कोविड-१९ मुळे कोणत्या व्यक्तीला सौम्य किंवा गंभीर लक्षणांनी आजारी पडेल की नाही, याचा अनुमान लावले जाईल.


हेही वाचा – जगातील पहिल्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू, दोन आठवड्यात पहिली बॅच तयार होणार