Omicron Variant: सावधान! ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट घालू शकतो धुमाकूळ, अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

Omicron Varian

देशात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. पण दुसऱ्याबाजूला जगातील काही देशांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहे. याबाबत अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की, ‘कोरोनाचा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा एक सब व्हेरिएंट BA.2 मुळे लवकरच अमेरिकेतील कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. तसेच हा सब व्हेरिएंट धुमाकूळ घालू शकतो.’

सीएनबीसी वृत्तात रविवारी म्हटले की, व्हाईट हाऊसचे मुख्य वैज्ञानिका सल्लागार फाऊची म्हणाले की, सध्या अमेरिकेत आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये सब व्हेरिएंटसंबंधित ३० टक्के रुग्ण असल्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनच्या तुलनेत BA.2 जवळपास ६० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. पण हा जास्त गंभीर नाहीये.

पुढे त्यांनी सांगितले की, या सब व्हेरिएंटमध्ये संसर्ग वाढवण्याची क्षमता आहे. पण यामुळे गंभीर स्वरुपाचा आजार होत नाही. तरीही गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी लस आणि बूस्टर डोस चांगले पर्याय आहेत. चीन आणि युरोपमधील काही भागांमध्ये सब व्हेरिएंटमुळे परिस्थिती पुन्हा गंभीर झाली आहे.

भारतात येणार का चौथी लाट?

भारतात चौथ्या लाटेबाबत तज्ज्ञ फारसे चिंतीत दिसत नाहीत. कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती नसून, त्यासाठी लसीकरण आणि प्रतिकारशक्ती यासह अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) वेल्लोर येथील माजी प्राध्यापक डॉ. टी. जेकब जान म्हणाले की, कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या येण्याची शक्यता खूपच धूसर आहे.


हेही वाचा – China Villages India : चिनी ड्रॅगनच्या पुन्हा कुरापती सुरूच; अरुणाचलच्या भारतीय हद्दीतील सीमेवर वसवली 624 गावं