Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यावरुन टीका करणाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी सुनावले खडेबोल

लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यावरुन टीका करणाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी सुनावले खडेबोल

जून महिन्यात राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना ११.४६ कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले

Related Story

- Advertisement -

देशात राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांत लस नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. यावर नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसुख मांडवीय यांनी सांगितले आहे की, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी फसवणूक करणारीव विधाने केली जात आहेत. देशातील सर्व राज्यांना माहिती देण्यात आली आहे की, कधी आणि कोणत्या तारखेली किती लसीचे डोस देण्यात येणार आहे. यामुळे जे नेते लसीच्या अपुऱ्या तुटवड्यावरुन वारंवार टीका करत आहेत त्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याची टीका केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे की, लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. वस्तुस्थितीद्वारे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकते. नेत्यांकडून लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यात येत आहेत. सरकारी व खासगी रुग्णलयांमार्फत लसीकरण करता येईल. जून महिन्यात राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना ११.४६ कोटी लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तर जुलै महिन्यात १३.५० कोटी लसींचे डोस उपलब्ध करुन देण्याची शक्यता असल्याचे मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान मनसुख मांडवीय यांनी पुढे म्हटलंय की, जुलै महिन्यात राज्यांना किती लसीचे डोस देण्यात येणार आहे. याविषयी केंद्र सरकारने १९ जून २०२१ रोजी सर्व राज्यांना माहिती दिली आहे. तसेच यानंतरही राज्यांना दररोज होणाऱ्या लसीच्या पुरवठ्याबाबत माहिती देण्यात येत आहे. यामुळे लसीचे किती डोस कधी मिळणार हे राज्यांना माहिती आहे. राज्य सरकारनं योग्य नियोजन करुन ग्रामीण भागात आणि जिल्हानिहाय लसीकरणाची विनाअडथळा तयारी करावी असे वक्तव्य मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.

- Advertisement -

लसीच्या उपलब्धतेविषयी अनेक नेत्यांकडून, राज्यांकडून आणि माध्यमांकडून माहिती मिळाली आहे. त्या आधारावर अभ्यास केला जात आहे. परंतु नेत्यांनी निरर्थक विधाने करुन जनतेमध्ये भीती पसवरण्यात येत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री मनसूख मांडवीय यांनी केली आहे.

- Advertisement -