
देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढत आहे. बऱ्याच राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वेगाने पसरत आहे. काही दिवसांपूर्वी SARS-CoV-2 तसेच जिनोम सिक्वेन्सिंगचा अभ्यास करणारी तज्ज्ञ समितीने INSACOGने देशात ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्गाला (Community Transmission) सुरुवात झाल्याची माहिती दिली. हा सामूहिक संसर्ग तिसऱ्या टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यानच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी आज, मंगळवारी ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठक बोलावली आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
एएनआयच्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज सकाळी साडे दहा वाजता ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, उत्तराखंड, दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश आणि चंदीगढ या राज्यांच्या समावेश आहे. या महत्त्वाच्या बैठकीमध्ये कोरोना परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे.
Mandaviya to hold meeting with health ministers of 9 states, UTs on COVID situation today
Read @ANI Story | https://t.co/J4U7N199cu#COVID19 pic.twitter.com/Q7ODAbRwt2
— ANI Digital (@ani_digital) January 25, 2022
यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली आणि दमण दीव यांच्या प्रमुख सचिव आणि आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये कोरोना नियंत्रणासाठीची तयारी, लसीकरण आणि पुढील रणनितीवर चर्चा करण्यात आली होती.
आजच्या बैठकीमध्ये काय होणार चर्चा?
९ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज बैठकीमध्ये कोरोनासंदर्भात चर्चा करतील. त्यामधील काही राज्यांची परिस्थिती खराब आहे. तसेच आगामी निवडणूक असणाऱ्या पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कोरोना परिस्थितीबाबतची पुढील रणनिती बनवली जाऊ शकते. दिल्लीमध्ये सध्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत होती.
हेही वाचा – Omicron : देशात ओमिक्रॉन संसर्गाचा वेग केव्हा थांबणार?