घरदेश-विदेशभारतीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

भारतीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याने पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

Subscribe

आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार झाल्याने भारतीय नेत्यांमध्ये अशी नैतिकता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

पर्यटनासाठी पोर्तुगालमध्ये गेलेल्या एका भारतीय महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला आहे. आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून पायउतार झाल्याने भारतीय नेत्यांमध्ये अशी नैतिकता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा – धोकादायक! 241 किमी ताशी वेगाने जपानच्या दिशेने सरकतेय हिनानॉर चक्रीवादळ

- Advertisement -

भारतीय गर्भवती महिला पोर्तुगालमध्ये पर्यटनासाठी गेली होती. तिला प्रसुती कळा जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, प्रसुती कक्षात तिला बेड उपलब्ध झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात जात असताना तिची प्रसुती झाली. मात्र, त्याच काळात तिला हृदयविकाराचा झटका आला, यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय.

हे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली. नेटकऱ्यांनी पोर्तुगाल सरकारवर टीकास्त्र सोडलं. वाढता जनरोष पाहता आरोग्यमंत्री मार्टा यांनी राजीनामा दिला आहे. त्या २०१८ पासून देशाच्या आरोग्यमंत्री होत्या. कोरोना काळात त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या कोरोना काळातील कामगिरीबाबत त्यांचं कौतुक केलं तर, देशातील आरोग्यव्यवस्था आणखी चांगली करण्याचे आश्वासन दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे दीर्घ आजाराने निधन

पोर्तुगालमध्ये आपत्कालीन सेवा बंद आहे. तर, रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा तुटवडा आहे. तसंच, गर्भवती महिलांना वेळेत सेवा मिळत नसल्याने आरोग्यमंत्र्यांवर टीका होत होती. मात्र, भारतीय गरोदर महिलेचा पोर्तुगालमध्ये उपचारांअभावी मृत्यू झाल्याने सोशल मीडियावर रोष वाढू लागला. त्यामुळे आरोग्यमंत्री मार्टा यांनी राजीनामा दिला.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -