घरदेश-विदेशकोरोना काळात स्ट्रेस फ्री रहा, तणावमुक्तीसाठी 'हा' Toll Free क्रमांक ट्राय केला?

कोरोना काळात स्ट्रेस फ्री रहा, तणावमुक्तीसाठी ‘हा’ Toll Free क्रमांक ट्राय केला?

Subscribe

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढत आहे. मात्र या सोबतच कोरोना कालावधीत लोकांमध्ये एकटेपणामुळे मानसिक तणावाची समस्या निर्माण झाली आहे. सतत वाढणाऱ्या कोरोना संसर्गाच्या बातम्यांमुळे  लोक दिवसेंदिवस अधिक तणावग्रस्त होत आहेत. ताण-तणाव आणि कोरोनाच्या चिंतेमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या अवस्थेमुळे लोकांना दिवसेंदिवस तणाव आणि नैराश्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी लोकांनी स्वत: ची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. कोरोना महामारी दरम्यान, स्वत: ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवत, तणाव आणि नैराश्याची लक्षणे वेळीच समजून घेणं गरजेच आहे.

नागरिकांमध्ये वाढणाऱ्या मानसिक तणावाबाबत आरोग्य विभागामार्फत जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे. यासह, मानसिक ताण टाळण्यासाठी कोरोनावरील उपचार घेणाऱ्या रूग्णांचे या मोहीमेंतर्गत कर्मचार्‍यांकडून समुपदेशनही केले जात आहे. मानसिक ताणतणावाने पीडित लोकांसाठी Health Ministry and Family Welfare ने एक टोल-फ्री नंबर देखील जारी केला आहे. या टोल-फ्री नंबरवर कॉल करून, तुम्ही देखील मानसिक ताण-तणावा संबंधित समस्यांचे निराकरण करू शकता. Health Ministry and Family Welfare ने जारी केलेल्या या 080-46110007 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मानसिक समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते.

- Advertisement -

 

- Advertisement -

कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण यांनी एक हेल्प लाईन क्रमांक जारी केला आहे. मंत्रालयाने असे म्हटले आहे की, जर तुम्हाला तणाव वाटत असेल किंवा नैराश्य वाटत असेल तर तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि मदत घेऊ शकता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासाठी 24×7 राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक 080-46110007 जारी केला आहे. तुम्ही अस्वस्थ असल्यास किंवा तणावग्रस्त असल्यास या क्रमांकावर कॉल करून मदत घ्यावी, असे अवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजमध्ये या संदर्भातील माहिती दिली आहे. लॉकडाऊनमुळे लोक तणावात आहेत, यामुळे लोक बऱ्याचदा चुकीचे पाऊल उचलत आहेत. तसेच कोरोना सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होत आहेत. ही समस्या लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -