घरCORONA UPDATEधक्कादायक! आता मुद्दाम मानवी शरीरात सोडला जाणार कोरोनाव्हायरस कारण

धक्कादायक! आता मुद्दाम मानवी शरीरात सोडला जाणार कोरोनाव्हायरस कारण

Subscribe

– जगभरात कोरोनाव्हायरसने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण कोरोनाव्हायरपासून बचावाचा प्रयत्न करत आहे. सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. नागरिकांना खबरदरी घेण्याच्या सूचना देत आहे. डॉक्टरही नागरिकांना कोरोनापासून संरक्षणरण्यासाठी सल्ले देत आहेत. कोरोना शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी जेजे काही करता येईल ते सर्वकाही केलं जातं आहे. असं असताना यूकेमध्ये मात्र मुद्दामहून कोरोनाव्हायरस माणसांच्या शरीरात सोडला जाणार आहे.

यूके सरकार ह्युमन चॅलेंज स्टडी करण्याचा विचार करत आहे. कोरोना लशीचा परिणाम आणि प्रभाव तपासण्यासाठी Challenge trails केलं जाणार आहे. ज्या निरोगी व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यांच्या शरीरात कोरोनाव्हायरस मुद्दाम शरीरात सोडणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश असावा. बीबीसीने फायनान्शिअल टाइम्सचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. याबाबत कोणतीही अधिकृत करार झाला नसल्याचंही बीबीसीने सांगितलं आहे.

- Advertisement -

सध्या ज्या लशींचं ट्रायल सुरू आहे किंवा ज्या लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतेक लशी इंजेक्शनमार्फत देता येतील अशा आहेत. मात्र इंजेक्शनशिवाय लस देण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. लस अधिक प्रभावी ठरावी यासाठी नाकावाटे दिली जाणारी लसही तयार करण्यात आली आहे. अमेरिकेच्या कोडाजेन्सिक्स या कंपनीने नाकावाटे दिली जाणारी कोरोना लस तयार केली आहे. CDX-005 असं या लशीचं नाव आहे.

पुण्याच्या सीरम संस्थेची भागीदारी 

या लशीच्या प्री-क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या असून आता लवकरच क्लिनिल चाचण्या होणार आहेत. सीरम इन्स्टिट्युटला या लशीचं भारतात उत्पादन घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियातही शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी १५० लोकांनी त्यांची नावं पाठवली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल. हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. मॅनसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने ही लस विकसित करण्यासाठी ३०  लाख डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे.


हे ही वाचा – ‘ऑफिसला जाता येईना, घरीही काम होईना’, यावर वसईकरांनी शोधली भन्नाट आयडीया!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -