घरदेश-विदेशराज्यातील सत्तानाट्यावर आज सुनावणी, सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे

राज्यातील सत्तानाट्यावर आज सुनावणी, सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे

Subscribe

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आज (3 ऑगस्टला) होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा निर्णय आज (3 ऑगस्टला) होण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का? हेही आज कळणार आहे.

यावर होणार सुनावणी –

- Advertisement -

राज्यात 30 जूनला शिंदे-फडणवीसांचे सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे गट यांनी एकमेकांविरुद्ध याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. शिंदे सरकारच्या आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिका तसेच शिंदे गटातील आमदारांना ठाकरे गटाने अपात्र ठरविणे, त्याचवेळी आपलाच गट अधीकृत असल्याचे सांगत शिंदे गटाने सादर केलेली याचिक आणि शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावणाऱ्या विधासभा उपाध्यक्षांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका, या सर्वांवर एकत्रित सुनावणी होणार आहे.

त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी –

- Advertisement -

शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या बाजूने आणि ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने परिस्थिती जैसे थे ठेवत ही सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र, आता ही सुनावणी आज (3 ऑगस्टला) होणर आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -