घरदेश-विदेशHeart Attack : गुजरातमध्ये सहा महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने 1052 जणांचा मृत्यू; तरुणांची...

Heart Attack : गुजरातमध्ये सहा महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने 1052 जणांचा मृत्यू; तरुणांची संख्या सर्वाधिक

Subscribe

गांधीनगर : गुजरातमध्ये गेल्या सहा महिन्यांत हृदयविकाराच्या झटक्याने एकूण 1052 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण मंत्री कुबेर दिंडोर यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली आहे. (1052 people died of heart attack in Gujarat in six months The number of youth is the highest)

हेही वाचा – Assembly Election Result : …देशातली जनता काँग्रेसला हद्दपार करेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

- Advertisement -

कुबेर दिंडोर म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत हदयविकाराच्या झटक्याने 1052 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे 80 टक्के मृत व्यक्ती 11 ते 25 वयोगटातील आहेत आणि त्यांच्यामध्ये लठ्ठपणाची कोणतीही लक्षणे नाहीत. आपत्कालीन सेवा रुग्णवाहिकांना (108) दररोज 173 हून अधिक हृदयविकारासंबंधी फोन प्राप्त होत आहेत. कोविड-19 साथीच्या आजारानंतर राज्यात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे पाहता सुमारे दोन लाख शालेय शिक्षक आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांना कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) चे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती कुबेर दिंडोर यांनी दिली.

सीपीआरच्या माध्यमांतून लोकांना जागरूक करणार 

राज्याच्या शिक्षण विभागाच्या पुढाकारातून सीपीआरचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यातील 37 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 3 ते 17 डिसेंबर या कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे 2,500 वैद्यकीय तज्ञ आणि डॉक्टर उपस्थित राहणार असून सहभागींना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. तसेच पोलिसांना यापूर्वीच सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आता शिक्षकांना हे प्रशिक्षण दिल्यानंतर एनएसएस आणि एनसीसी कॅडेट्सनाही हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, जेणेकरून हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तरुणांना सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवता येतील, असेही कुबेर दिंडोर यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – Election Results : लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त तर, विधानसभेच्या सव्वादोनशे जागा जिंकणार; बावनकुळेंना विश्वास

हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूला कोरोनाची लस जबाबदार नाही – पटेल

गेल्या सहा महिन्यांत गुजरातमध्ये हदयविकाराच्या झटक्याने 1052 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, परंतु आरोग्यमंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते हृषिकेश पटेल म्हणतात की, माझ्याकडे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची अशी कोणतीही आकडेवारी नाही. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या प्रकरणांचा आयसीएमआरद्वारे अभ्यास केला जात आहे. राज्य सरकारही अशा बाबतीत जनजागृती करत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूला कोरोनाची लस जबाबदार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -