घरCORONA UPDATEबरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून कोरोना होतो का? आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तर

बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून कोरोना होतो का? आरोग्य मंत्रालयाने दिले उत्तर

Subscribe

सोमवारी आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत हा भ्रम दुर केला.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या २८ हजारांच्या पार गेली आहे. आतापर्यंत ९२६ लोकांचा बळी गेला आहे, तर ६ हजार ९७६ लोक बरे झाले आहेत. मात्र, बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांपासून कोरोनाचा प्रसार होतो असं लोकांना वाटतं. दरम्यान, आज सोमवारी आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत हा भ्रम दुर केला. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘कोविड -१९ रूग्णांविषयी संभ्रम आहे. बरे झालेल्या रूग्णांमधून संसर्ग होण्याचा धोका नाही, उलट त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरुन इतरांना बरं करता येतं. ‘ अग्रवाल म्हणाले की, देशातील संक्रमित रूग्णांमध्ये निरोगी रूग्णांची संख्या वाढून ६,१८४ झाली आहे. हे संक्रमित रूग्णांच्या एकूण संख्येच्या २२.१७ टक्के आहे.

मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आतापर्यंत ९२६ लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या परिणामाची माहिती देताना अग्रवाल म्हणाले की, देशात १६ जिल्हे असे आहेत जिथे गेल्या २८ दिवसांपासून एकही संक्रमीत व्यक्ती सापडलेली नाही. ते म्हणाले की, २४ एप्रिलनंतर महाराष्ट्रातील गोंदिया, कर्नाटकातील दावणगिरी आणि बिहारमधील लखीसराय हे तीन जिल्हे या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. त्याच वेळी, उत्तर प्रदेशातील पीलीभीत आणि पंजाबमधील एसबीएस संक्रमणाच्या नवीन प्रकरणांमुळे त्यांना या यादीतून काढून टाकलं गेलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …आणि ‘हुकुमशहा’ प्रेमात पडला! वाचा किम जोंग उन यांची प्रेम कथा


अग्रवाल यांनी माहिती दिली की कोविड -१९ चा एकाही रुग्ण गेल्या १४ दिवसांपासून २५ राज्यांतील ८५ जिल्ह्यात आढळला नाही. ते म्हणाले की कोरोना विषाणूची लागण रोखण्याच्या मोहिमेमध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी आणि संक्रमित रुग्णांना भेदभावपूर्ण वागणूक दिल्याच्या घटनांबाबत मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की कोरोना विषाणूचा संसर्ग हा कलंक नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -