घरदेश-विदेशयुरोपात १०० वर्षात पहिल्यांदाच मुसळधार पावसाचे थैमान, आत्तापर्यंत ५५ लोक ठार, तर...

युरोपात १०० वर्षात पहिल्यांदाच मुसळधार पावसाचे थैमान, आत्तापर्यंत ५५ लोक ठार, तर १३०० हून अधिक बेपत्ता

Subscribe

एकीकडे अमेरिका आणि कॅनडासारखे देश तीव्र उन्हाच्या झळांच्या सामना करतायंत, तर दुसरीकडे युरोपात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे युरोपातील अनेक नद्यांना पुर आलाय. या भीषण पुरात आत्तापर्यंत कमीतकमी ५५ लोक ठार झालेत तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत. या पावसामुळे गेल्या १०० वर्षात पहिल्यांदाच युरोपात भीषण पूर आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर जर्मनीत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आत्तापर्यंत १३०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे शहारांतील कालव्यांचे पाणी क्षमतेच्या पलीकडे गेल्याने रस्त्यांना नदीचे रुप आले आहे.

जर्मनीसह नेदरलँड, लक्झेंबर्ग आणि बेल्जियममध्येही मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात नेदरलँड्समधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अतिवृष्टीमुळे पुराचा जोर कायम असल्याने लाखो घरांचे नुकसान झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांचा जीव वाचवणे सुरक्षा दलासाठी अवघड जात आहे. अचानक आलेल्या पूरमुळे जर्मनीसह अनेक भागांत इमारती कोसळल्या आहेत. सीएनएनच्या अहवालानुसार,या पुराचा सर्वाधिक फटाक जर्मनी देशाला बसलाय. आतापर्यंत याठिकाणी ४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बेल्जियममध्ये १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -
  heaviest rainfall cause flooding in europe killed dozens many people missing in germany
नेदरलँड्सच्या दोन जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

‘गेल्या १०० वर्षात इतका पाऊस पडला नाही’

लक्झेंबर्ग आणि नेदरलँडमध्ये ही अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. जर्मनीच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षात इतका पाऊस कधी झाला आहे. यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरात पुराची स्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात बर्‍याच इमारती कोसळल्या. बुधवारपासून ते गुरुवारपर्यंत शहारात १०० ते १५० मिमी पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे. इतका पाऊस एका महिन्यात होतो.

जर्मनीमधल्या ऱ्हाईनलंड – पॅलाटिनेट आणि उत्तर ऱ्हाईन – वेस्टफेलिया भागांना या अतिवृष्टीचा सर्वात वाईट फटका बसलाय. तर कोलोनमध्ये २४ तासांत सुमारे १५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसात देशातील दक्षिण वालोनिया शहरालाही बसला आहे. कारण हे शहर जर्मनीला लागून आहे. हवामान बदलांमुळे हे संकट आल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

नेदरलँड्सच्या दोन जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

बेल्जियममधील रेल्वेसह अनेक अत्यावश्यक सेवांवरही पुराचा वाईट परिणाम झाला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे मेउसे नदीत पूर येण्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे नेदरलँड्समधील हेउगेम आणि रँडवयक या दोन जिल्ह्यांतील लोकांना घरे सोडण्याच्या सुचना देत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कारण नदीतील पाण्याची पातळी सतत वाढत असून पुर येण्याची शक्यता आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -