घरदेश-विदेशअयोध्येत ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक; अपघातात ७ जणांचा मृत्यू

अयोध्येत ट्रक आणि बसमध्ये जोरदार धडक; अपघातात ७ जणांचा मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये बस आणि ट्रक या वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये बस आणि ट्रक या वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे. तर या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटना लखनऊ-गोरखपूर महामार्गावर झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तर घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींना वाचवण्याचे काम सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील झालेल्या या अपघातातील बसही लखनऊ येथून येत होती. यावेळी या रस्त्यावर गोरखपूर मार्गे एक ट्रक येत होता. पण वळणाच्या रस्त्यावर या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. ही अपघात इतका भीषण होता की, या वाहनांच्या धडकेमध्ये ट्रक उलटा होऊन थेट बसच्या वर येऊन पडला.

- Advertisement -

हेही वाचा – अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवेंनी व्यक्त केले मत, म्हणाले…

सदर अपघातानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. तर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख
सदर घटनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट देखील केले आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटरवरून पोस्ट करण्यात आलेली आहे. “अयोध्येतील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मनस्वी दु:ख झाले आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो” असे ट्वीट करण्यात आले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या ‘अक्षय्य तृतीया’ ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -