घरताज्या घडामोडीदिल्लीत तेल कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

दिल्लीत तेल कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Subscribe

दिल्लीतील बवाना इंडस्ट्रियल एरियातील एका तेल कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळच्या सुमारास घडली. सेक्टर-२ मध्ये असलेल्या या कारखान्याला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कारखान्यात केमिकल असल्यामुळे आगीने संपूर्ण कारखान्याला वेढले होते. घटनास्थळावरून आगीच्या लोळ उठत आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रेटर नोएडातील तेल फॅक्टरी इकोटेक -३ पोलीस स्टेशन परिसरातील आहे. केमिकलने भरलेले काही ड्रम ग्रेटर नोएडा इकोटेक – ३ पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोल पंपाजवळ ठेवण्यात आले होते. या रसायनांनी भरलेल्या ड्रममध्ये सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर काही वेळेतच त्या आगीने रौद्र रुप धारण केलं होतं.

- Advertisement -

२०२२ मधील नोव्हेंबर महिन्यातही अशाच प्रकारची एक घटना घडली होती. दिल्लीतील नरेला येथे एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते.


हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -